शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा

By admin | Updated: April 10, 2015 02:28 IST

निसर्ग कोपला; गारपिटीमूळे मेहकर तालुक्यात बैल, गाय व शेळी ठार.

मेहकर : तालुक्याला ९ एप्रिल रोजी सायंकाळी अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसला. गारपिटीने तालु क्यातील बहुतांश गावांमध्ये कांदा बियाण्याचे नुकसान झाले आहे. कनका शिवारात गारपिटीने एक शेळी ठार, तर तीन शेळ्या जखमी झाल्या आहेत. शहापूर शिवारात वीज कोसळून एक बैल ठार झाला, तर पांगरखेड येथे झाडाखाली दबून एका गायीचा मृत्यू झाला. तालुक्यात सायंकाळी ४ च्या सुमारास डोणगाव, घाटबोरी, लोणीगवळी, शेलगाव देशमुख, गोहोगाव दांदडे, पांगरखेड, बेलगाव, कनका, राजगड, विठ्ठलवाडी, शहापूर, भोसा परिसरातील गावांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. गोहोगाव येथील विजय दांदडे, शे. इस्माईल, सोपान भालेराव, रामभाऊ कानकटाव, ज्ञानबा सावकार, कडूभाई, रमेश सबरदिंडे, माणिक कानकटाव, शेलगाव देशमुख येथील सलामभाई, भानुदास शेळके, पांगरखेड येथील दत्ता येवतकर, गजानन राठोड, लक्ष्मण मांजरे, राजू सवडतकर, मधुकर सुर्वे यांच्याकडील साहित्याचे गारपिटीने मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. पांगरखेड येथील सु. गा. सुर्वे यांची रस्त्यावर बांधलेली गाय झाडाखाली दबून जागीच ठार झाली. शहापूर येथील अनंत शेषराव नरवाडे यांच्या शेतात वीज कोसळून झामराव चिमा काळे यांच्या मालकीचा एक बैल ठार झाला तसेच परिसरातही शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. कनका येथील कडुजी तुकाराम राजेकर हे गावातीलच प्रभाकर त्र्यंबक ठोकळ यांच्या शेतात १५ शेळ्या चारण्याकरिता घेऊन गेले होते. वादळी वार्‍यासह झालेल्या गारपिटीचा या १५ शेळ्यांना चांगलाच तडाखा बसला. एक शेळी ठार झाली, तर तीन शेळ्या गंभीर जखमी झाल्या आहेत. कळपातील दोन शेळ्या बेपत्ता झाल्या आहेत. या गारपिटीने कडुजी राजेकर यांचे जवळपास दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यात वादळी वार्‍यासह झालेल्या गारपिटीने अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली, तर शेतातील भाजीपाला व कांदा बियाण्यासह आंब्याचेही मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. लोणार तालुक्यातील सोमठाणा, खापरखेड, महारचिकना, खळेगाव परिसरातही अवकाळी पावसासह गारपीट झाली.