शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
4
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
5
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
6
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
7
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
8
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
9
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
10
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
11
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
12
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
13
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
14
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
15
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
16
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
17
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
18
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
19
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
20
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
Daily Top 2Weekly Top 5

१९३0 शेतकर्‍यांचे ४ कोटी १४ लाखाचे अनुदान रखडले

By admin | Updated: June 28, 2014 22:40 IST

१९३0 शेतकर्‍यांचे तब्बल ४ कोटी १४ लाख १७ हजार रु. अनुदान अद्यापपर्यंत शासनाने दिले नसल्याने

धाड : कमी पाण्याचा वापर होऊन कृषी उत्पादन घेण्यासाठी ह्यसुक्ष्म सिंचनह्ण योजना सर्वत्र राबवली. यासाठी शेतकर्‍यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन संचावर अनुदान देऊन प्रोत्साहन दिले. मात्र बुलडाणा तालुक्यात आजरोजी गेल्या वर्षभरापासून १९३0 शेतकर्‍यांचे तब्बल ४ कोटी १४ लाख १७ हजार रु. अनुदान अद्यापपर्यंत शासनाने दिले नसल्याने या भागातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.सन २0१३ मध्ये बुलडाणा तालुक्यातून २७५६ शेतकर्‍यांचे अनुदान प्रस्ताव कृषी विभागास प्राप्त झाले. पैकी कृषी विभागास सन २0१३ मध्ये १ कोटी ३७ लाख ३ हजार रु. निधी प्राप्त झाला. यामधून कृषी विभागाने ८२६ शेतकर्‍यांचे प्रस्ताव मार्गी लावत अनुदान वाटप केले. तर आज १९३0 शेतकर्‍यांचे प्रस्ताव प्रलंबित पडून असल्याने ते आर्थिक अडचणीत आहेत. कृषी विभागाकडून सुक्ष्म सिंचन योजनेत ठिबक व तुषार सिंचन संचाचे खरेदीवर अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांस ७५ टक्के अनुदान तर सर्वसाधारण भूधारक शेतकर्‍यांस ५0 टक्के अनुदान देणारी ही प्रभावी योजना आहे. ठिबक सिंचन संच व तुषार सिंचन संच हे शेतकर्‍यांनी स्थानिक पातळीवर दुकानदारांकडून पूर्ण किमतीनी खरेदी करुन आवश्यक कागदपत्राची पूर्तता करुन अनुदानाचा प्रस्ताव कृषी विभागाचे कार्यालयात सादर करावा. याठिकाणी सर्व प्रकरणांची ऑनलाईन नोंदी होऊन शासनाकडून त्यास मान्यता मिळाल्यानंतर थेट अनुदान हे शेतकर्‍यांचे खात्यात जमा होते.
पुर्वी मात्र स्थानिक पातळीवरील कृषी दुकानदार हे शासकीय अनुदान रक्कम वगळून ठिबक व तुषार संच शेतकर्‍यांना विक्री करत आणि नंतर मिळवीत यामध्ये शेतकर्‍यांना शासकीय कार्यालयाच्या येरझार्‍यातून सुटका मिळत होती. परंतु गेल्या काही वर्षात ही पद्धत शासनाने बदलल्याने शेतकर्‍यांना आपल्या अनुदानासाठी कृषी कार्यालयाचे उंबरठे झिवण्याची वेळ आली आहे.यामध्ये प्रत्येक शेतकर्‍यास नगदी रोख रक्कम पूर्ण भरुन ठिबक व तुषार संच खरेदी करावे लागतात, यासाठी बहुतांश शेतकर्‍यांनी कर्ज काढून हे संच खरेदी केली आहे. मात्र अनुदान न दिल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.