शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Century : किंग कोहलीचा 'शतकी रोमान्स'! रायपूरच्या मैदानातही विक्रमांची 'बरसात'
2
"भारताचे तुकडे झाले, तरच...!"; बांगलादेशच्या माजी लष्करी अधिकाऱ्याचे विषारी फुत्कार, कोण आहे अब्दुल्लाहिल अमान आजमी?
3
मोठी उलथापालथ! ओला इलेक्ट्रीक रसातळाला पोहोचली; नोव्हेंबरच्या रेसमध्ये बाहेर फेकली गेली 
4
मोठी बातमी! 26/11 हल्ल्यावेळी दहशतवाद्यांशी लढलेले IPS अधिकारी सदानंद दाते राज्याचे नवे पोलीस महासंचालक
5
तुमचे पैसे SBI, HDFC किंवा ICICI बँकेत असेल तर खुशखबर! RBI ने 'या' ३ बँकांसाठी केली मोठी घोषणा
6
ॲपलचा विरोध, विरोधकांचाही विरोध! केंद्राचा  'संचार साथी' ॲपवर यू-टर्न, प्री-इंस्टॉल करण्याची अनिवार्यता मागे घेतली...
7
५ मुलांची आई भंगारवाल्याच्या प्रेमात पडली! वयाचाही विचार केला नाही; पतीसमोर बांधली दुसरी लग्नगाठ
8
Ruturaj Gaikwad Maiden Century : पुणेकरानं संधीचं सोनं करुन दाखवलं! या कारणामुळं ऋतुराजची पहिली सेंच्युरी ठरते खास
9
काय सांगता? फक्त स्वत:ला पाहण्यासाठी नाही तर 'या' कारणांसाठी लिफ्टमध्ये असतो आरसा
10
सांगलीतील आष्ट्यातील स्ट्राँगरुमबाहेर महाविकास आघाडीचा गदारोळ; मतांच्या आकडेवारीत तफावत, सुरक्षा नसल्याचाही दावा
11
अल-फलाहचा बनावट कारभार! रोज तयार व्हायची १००-१५० बोगस रुग्णांची यादी; विरोध केल्यास हिंदू कर्मचाऱ्यांचा पगार कापायचे
12
"कपडे घालून या नाहीतर गोळ्या घालू..."; जैन मुनींशी गावगुंडाचे असभ्य वर्तन, समाज संतप्त
13
श्रद्धा कपूरने बॉयफ्रेंड राहुल मोदीला हाताने भरवली 'जापानी डिश', व्हिडीओ व्हायरल
14
पुतीन भारतात येण्यापूर्वी रशियाकडून मोठी भेट...! रशियन लष्करी तळ वापरता येणार, त्यांच्या संसदेची मंजुरी...
15
दिल्ली कार स्फोटातील मुख्य आरोपी जसीरच्या कोठडीत वाढ! NIA आणखी चौकशी करणार; नेमके आरोप काय? 
16
Gold Silver Price Today: चांदी ऑल टाईम 'हाय'वर; सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदी करणार असाल तर खिसा करावा लागेल रिकामा
17
'मुंबई इंडियन्स'ने संघात घेताच कर्णधार शार्दुल ठाकूरचा धमाका; ७ चेंडूत घेतले ४ बळी
18
फार्मा क्षेत्रातील दुसरी सर्वात वेगवान वाढणारी कंपनी IPO आणतेय; एका लॉटसाठी किती पैसे लागणार?
19
सावधान! आईस्क्रीम, च्युइंगम, शुगर फ्री प्रोडक्टमुळे लिव्हर खराब; खाण्याआधी एकदा 'हे' वाचाच
Daily Top 2Weekly Top 5

‘ए’ ग्रेडच्या डाळिंबाला ‘लो’ ग्रेडचा भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:51 IST

डाळिंबाचे भाव घसरले असून, सध्या १४0  रुपये किलोच्या उच्च डाळिंबाला केवळ ७ रुपये किलो  म्हणजे कमी प्रतिचा भाव मिळत आहे. शेतकर्‍यांना  डाळिंबाचे उत्पादन घेण्याकरिता पहिल्या टप्प्यात एकरी  ८५ हजार रुपये खर्च येत असून, उत्पादनातून केवळ ३६  हजार ७५0 रुपयेच मिळत आहेत. उत्पन्नापेक्षा खर्च दु प्पट झाल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत सा पडले आहेत. 

ठळक मुद्देउत्पन्नापेक्षा खर्च दुप्पट डाळिंबाचे दर पोहोचले सात रुपयांवर!  डाळिंब उत्पादकांचे अर्थचक्र बिघडले

ब्रम्हानंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  डाळिंबाचे भाव घसरले असून, सध्या १४0  रुपये किलोच्या उच्च डाळिंबाला केवळ ७ रुपये किलो  म्हणजे कमी प्रतिचा भाव मिळत आहे. शेतकर्‍यांना  डाळिंबाचे उत्पादन घेण्याकरिता पहिल्या टप्प्यात एकरी  ८५ हजार रुपये खर्च येत असून, उत्पादनातून केवळ ३६  हजार ७५0 रुपयेच मिळत आहेत. उत्पन्नापेक्षा खर्च दु प्पट झाल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी अडचणीत सा पडले आहेत. आधुनिक शेतीची कास धरत शेतकरी फळबाग  घेण्याकडे वळले आहेत. फळबागेमध्ये डाळिंब शेतीचे  क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील ७३ हजार २७  हेक्टर क्षेत्र डाळिंब पिकाखाली येते. त्यापैकी सुमारे ४१  हजार हेक्टर क्षेत्र डाळिंब उत्पादनाखाली आहे. त्यापासून  ४ लाख १0 हजार मे.टन इतके उत्पादन राज्यभरातून घे तले जाते. डाळिंब पिकाची लागवड अहमदनगर, पुणे,  सांगली, सोलापूर, या जिल्ह्यांपाठोपाठ आता वाशिम व  बुलडाणा जिल्ह्यातही होत आहे. बुलडाणा जिल्ह्यामध्ये  बुलडाणा, चिखली, मेहकर, संग्रामपूर, जळगाव जामोद  या तालुक्यातील काही भागात डाळिंबाचे उत्पादन घेतले  जाते. डाळिंबाचे पिकास थंड व कोरडे हवामान उपयुक्त  आहे. अशा हवामानात चांगल्या प्रतीची फळे तयार हो तात. मोठे व चांगल्या प्रतीच्या फळांना ‘ए’ ग्रेड मिळत असून,  त्यानुसार त्याला भावही प्रतिकिलो १00 रुपयांच्यावर  राहतो. गेल्यावर्षी १४0 रुपये किलोने विकल्या जाणार्‍या  डाळिंबाची यावर्षी केवळ ७ रुपये किलोने शे तकर्‍यांकडून खरेदी केली जात आहे. डाळिंबाची  लागवड केल्यानंतर पहिला बार येईपर्यंत शेतकर्‍यांना   १७ महिने प्रतीक्षा करावी लागते. त्यानंतर फळधारणा  होते. परंतु, यादरम्यान शेणखत, छाटणी, रासायनिक ख त देणे, फवारणी, मजुरी आदींसाठी जवळपास ८५ हजार  रुपये एकरी खर्च लागतो. त्यानंतर एका एकरामध्ये जवळपास ५ हजार २५0 किलो  उत्पादन होतो, या उत्पादनाला सध्या ७ रुपये प्र ितकलोचा भाव मिळत असल्याने एक एकरामध्ये ३६  हजार ७५0 रुपयांचे उत्पादन शेतकर्‍यांच्या हाती येत  आहे.डाळींबाला भाव कमी मिळत असल्याने उत्पन्नापेक्षा उत् पादनाचा खर्च दुप्पट होत असल्याने डाळींब उत्पादक  शेतकरी अडचणीत सापडले आहेत. 

डाळिंब उत्पादकांचे अर्थचक्र बिघडलेएका एकरामध्ये शेतकर्‍यांना डाळिंबाचे सरासरी ५ हजार  २५0 किलो उत्पादन पहिल्या टप्प्यात होत आहे. सध्या  सात रुपये प्रतिकिलो भाव मिळत आहे. यासाठी ८५  हजार रुपये खर्च येत असून, ३६ हजार ७५0 रुपयांचे  होत असल्याने शेतकर्‍यांना पहिल्या टप्प्यातील उत् पादनातून ४८ हजार २५0 रुपयांची झळ सोसावी लागत  आहे. कमी भावामुळे डाळिंबाची शेती तोट्यात गेल्याने  डाळिंब उत्पादकांचे अर्थचक्र बिघडले आहे.

डाळिंबावर २६ वेळा फवारणीएका एकरामध्ये डाळिंबाचे ३५0 झाडे लागतात; परंतु  कीड व रोगापासून डाळिंबाला वाचविण्यासाठी फवारणी  महत्त्वाची आहे. त्यासाठी पहिल्या वेळची फळधारणा  होईपर्यंत जवळपास २६ वेळा फवारणी करावी लागत  असून, एका फवारणीला दोन हजार रुपये खर्च शे तकर्‍यांना येत आहे. त्यामुळे डाळिंबाच्या शेतीसाठी  एकूण फवारणीवर ५२ हजार रुपये खर्च शेतकर्‍यांचा  होत आहे. डाळिंबाच्या उत्पन्नाच्या मानाने खर्च अधिक  आहे. 

१४0 रुपये भाव मिळणार्‍या डाळिंबाची सध्या मातीमोल  भावाने विक्री करावी लागत आहे. डाळिंबाचे उत्पादन  घेण्यासाठी ८५ हजार रुपये खर्च येत आहे; मात्र त्या  तुलनेत भाव मिळत नाही. सध्या केवळ सात रुपये प्र ितकिलोने डाळिंब विक्री करावी लागत असल्याने  डाळिंब शेतीत शेतकर्‍यांना तोटाच सहन करावा लागत  आहे.- दिनकर गायकवाड, डाळिंब उत्पादक, पळसखेड  दौलत.