शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चांगला पाऊस, पीक परिस्थिती सर्वसाधारण

By admin | Updated: April 30, 2017 03:03 IST

सर्व शेतकरी बांधवांच्या आशेची उत्सुकता वाढविणारी येथील घटमांडणी आणि त्यांचे भाकीत २९ एप्रिल रोजी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज यांनी जाहीर केले.

जयदेव वानखडेजळगाव जामोद-सर्व शेतकरी बांधवांच्या आशेची उत्सुकता वाढविणारी येथील घटमांडणी आणि त्यांचे भाकीत २९ एप्रिल रोजी पुंजाजी महाराज व सारंगधर महाराज यांनी जाहीर केले. त्यानुसार २०१७-१८ च्या खरीप आणि रब्बी हंगामातील पीक परिस्थिती सर्वसाधारण राहील. परंतु अवकाळी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने काही भागामध्ये पिकांची नासाडी होईल. पावसाळा देखील चांगला होईल त्यामध्ये जुन महिन्यात कमी, जुलैमध्ये जास्त, आॅगस्टमध्ये सर्वाधिक तर सप्टेंबर महिन्यात कमी पाऊस येईल. जुन महिन्यातील कमी पावसामुळे पेरणीही मागे पुढे होईल. राजकारणाबाबत राजाची गादी ही कायम आहे राजा ही कायम आहे. परंतु गादीवरील मातीमुळे राजाचा ताण वाढेल असे सांगण्यात आले. परकीय राष्ट्रांच्या देशविरोधी कारवाया सुरूच राहतील. परंतु देशाची संरक्षण व्यवस्था त्यांना समर्थपणे तोंड देईल. पाऊस चांगला असल्याने जलाशय भरलेली राहतील. पृथ्वीला मात्र मोठमोठ्या संकटांचा सामना करावा लागेल. त्यामध्ये अतिवृष्टी, महापूर, भुकंप, त्सुनामी सारखी संकटे उद्भवतील. गुराढोरांच्या चाऱ्यांची टंचाई जाणवेल. तर अशा येणाऱ्या अनेक संकटांमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईस येईल. तिजोरीवर प्रचंड ताण येवून देशात चलन तुटवडा भासेल, असे भाकीत वर्तविण्यात आले. त्यामुळे पिक-पाणी साधारण असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवड या गावी यावेळी सतत गेल्या ८/१० वर्षापासून भेंडवड मांडणीसाठी येणारे आणि शेतकऱ्यांसाठी मुक्कामी व चहाफराळाची व्यवस्था देणारे मलकापूर मतदार संघाचे आ.चैनसुख संचेती यांचा पुुंजाजी महाराज वाघ यांचे हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.