शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
2
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
3
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
4
मुनव्वर फारुकीने केला दुसरा निकाह? सोशल मीडियावर चर्चांना उधाण; दुसरी पत्नी कोण?
5
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडली गेली...
6
हृदयद्रावक! एक आठवड्यापूर्वीच झालेलं लग्न; राजकोट गेमिंग झोन आगीत पती-पत्नीचा मृत्यू
7
भाजपला आताच सांगा...! लोकसभेच्या निकालापूर्वीच भुजबळांनी विधानसभेच्या जागावाटपाची ठिणगी टाकली
8
“यूपीत एनडीएला ७५ प्लस जागा मिळतील, महाराष्ट्रात...”; रामदास आठवलेंनी थेट आकडा सांगितला
9
राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या पक्षाला किती जागा मिळतील? अमित शाहंनी केली भविष्यवाणी
10
सेम टू सेम! जुळ्या भावांचे यशही जुळं; सार्थक अन् स्वप्नीलने दहावीत मिळविले १०० टक्के गुण
11
इमरान हाश्मी नव्हता 'मर्डर'साठी पहिली पसंती, या अभिनेत्याची झाली होती निवड
12
१९९१ साली जे घडलं ते पुन्हा नको म्हणून २००४ ला CM पद नाकारलं; अजित पवारांचा दावा
13
पाकिस्तानचे पुन्हा एकदा दोन तुकडे होतील; माजी PM इम्रान खान यांनी व्यक्त केली चिंता
14
SRH च्या पराभवानंतर काव्या मारन रडली; आता संघातील 'या' खेळाडूंची होणार गच्छंती...
15
Sensex पहिल्यांदाच ७६ हजार पार, निफ्टीनंही रचला इतिहास; निवडणूक निकालांपूर्वी VIX ५% वाढला
16
"कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी..."; मनु्स्मृतीबाबत बोलताना अजित पवारांचे मोठं विधान
17
Gold-Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरानं वाढवली सराफा बाजारातली गरमी, घसरणीनंतर पुन्हा वाढले दर
18
भारतात पहिल्यांदाच आले सर्वात मोठे जहाज; चार फुटबॉलचे मैदान होतील एवढी आहे जागा
19
"स्वाती मालीवाल जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसल्या", विभव कुमारांच्या वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद! 
20
Anurag Thakur : "काँग्रेसचं पाकिस्तानवर प्रेम, भारताच्या भागाला PoK बनवलं"; अनुराग ठाकूर कडाडले

कृषी पंपासाठी दिवसा विज द्या, अन्यथा हिवाळी अधिवेशनात आंदोलन -नानाजी आखरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 3:05 PM

शासनाने कृषिपंपास सूर्योदय ते सूर्यास्त पर्यंत म्हणजेच दिवसा वीजपुरवठा द्यावा अन्यथा आगामी हिवाळी अधिवेशनात आंदोलन करण्याचा  इशारा भारतीय किसान संघाचे  प्रांताध्यक्ष नानाजी आखरे यांनी येथे दिला. 

लोकमत न्युज नेटवर्कशेगाव - रात्री पिकांना पाणी देणे त्रासाचे तसेच वन्यप्राण्यामुळे असुरक्षिततेचे आहे. यामध्ये शेतकºयाच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता जास्त असते. त्यासाठी शासनाने कृषिपंपास सूर्योदय ते सूर्यास्त पर्यंत म्हणजेच दिवसा वीजपुरवठा द्यावा अन्यथा आगामी हिवाळी अधिवेशनात आंदोलन करण्याचा  इशारा भारतीय किसान संघाचे  प्रांताध्यक्ष नानाजी आखरे यांनी येथे दिला. शेगाव येथील अग्रसेन भवन मध्ये आयोजित भारतीय किसान संघाच्या  विदर्भ प्रांतीय त्रैवार्षिक अधिवेशनाच्या समारोपानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय संघटन मंत्री दिनेश कुळकर्णी, प्रांत महामंत्री बाबुराव देशमुख, सुभाष लोहे, दादा लाड, रमेश मंडाळे, बबनदादा भुतडा, कृष्णलाल रावलानी, प्रल्हाद काळे, आनंदराव घनोकार यांची उपस्थिती होती.  शासनाच्या कृषी विभागाने कामाची गती वाढवावी  ‘शेत तिथे रस्ता’ करण्यासाठी  तहसीलदारांनी प्रभावी अंमलबजावणी करावी. वन्यप्राण्याच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत्यू होणाºया शेतकरी कुटूंबातील व्यक्तीला शासकीय मदत देण्यासाठी शासनाने सातबाराधारक शेतकरी  नव्हे  तर त्या शेतकºयांचे संयुक्त कुटूंब घटक मानले पाहिजे असेही त्यांनी सांगितले. सेंद्रिय शेतीसाठी जनावरे असणे महत्वाचे आहे.सेंद्रिय शेतीसाठी गोशाळेला  अनुदान द्यावे यावर्षी पाऊस कमी पडल्याने पाणी समस्या निर्माण होणार आहे त्यामुळे जनावरांसाठी शासनाने एप्रिल, मे, जून या तीन महिन्यासाठी प्रत्येक तालुक्यात ४ छावण्या सुरू कराव्या. गायीची अवैध कत्तल रोखण्यासाठी गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करून कायदा कठोर करावा. दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने कोरडवाहू शेती करणारा शेतकरी मेटाकुटीस आला आहे.याकरता सरकारने सिंचन प्रकल्पाला गती देऊन विदभार्तील शेतजमीन सिंचनाखाली आणावी. जिगाव प्रकल्पात बुडीत संपादित झालेल्या जमीन संदभार्तील खरेदी विक्री चे निर्बंध शिथिल करावे अशी मागणी सुद्धा भारतीय किसान संघाचे प्रांताध्यक्ष नानाजी आखरे यांनी केली आहे. 

शेतजमिनीचे कुंपनासाठी १०० टक्के अनुदान द्यावन्य प्राण्यांपासून शेतीपिकांचे संरक्षण व्हावे याकरता शासनाने शेताला कुंपण घालून द्यावे किंवा शेतकºयांना कुंपणासाठी शेत १०० टक्के अनुदान देण्याची अनुदान द्यावे अशी आग्रही मागणी भारतीय किसान संघाने मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे प्रांताध्यक्ष नानाजी अखेर यानी  सांगितले.

भारतीय किसान  संघ विदर्भ प्रांताची नुतन कार्यकारिणी घोषितभारतीय किसान संघाची विदर्भ प्रांत कार्यकारिणी घोषीत करण्यात आली. यामध्ये प्रांताध्यक्ष नाानाजी आखरे  नागपूर, महामंत्री बी ए देशमुख  शेगाव, उपाध्यक्ष किरण बरवे गडचिरोली, सुभाष  देशमुख धामणगाव रेल्वे, मुगुटराव भिसे उमरा (भिसे)  खामगाव,सहमंत्री बाबाराव कपिले, कोषाध्यक्ष रामभाऊ गायकवाड यवतमाळ, जैविक शेती प्रमुख मधुकर सरप अकोला, सह जैविक शेती प्रमुख सुरेश श्रीराव मोर्शी, महिला प्रमुख लताताई पोहेकर निंबी मोर्शी , अ‍ॅग्रो एकानॉमिक रिसर्च सेंटर  प्रमुख बी आर पाटील चिखली, संघटनमंत्री रमेश मंडाळे नागपूर , सदस्यांमध्ये पांडुरंग गायकी कडोसी ता बाळापूर, पुंडलिक लांडगे वर्धा , संजय डेहनकर दारव्हा ,माधवराव कापगते लाखनी भंडारा आदींचा समावेश आहे.

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरीagricultureशेतीagitationआंदोलन