शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातून प्रेयसीचा खून

By admin | Updated: November 29, 2014 00:07 IST

डोणगाव येथील घटना, आरोपी फरार.

मेहकर (बुलडाणा) : अनैतिक प्रेम संबंधातून एका ४५ वर्षीय महिलेचा प्रियकराने धारदार शस्त्राने गळ्यावर वार करुन खून केला व प्रेत डोणगाव येथील शासकीय धान्य गोदामाच्या पाठीमागे टाकून दिले. घटना २८ नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली असून, प्रकरणातील आरोपी मात्र फरार आहे.डोणगाव येथील शासकीय धान्य गोदामाच्या पाठीमागे एका महिलेचे प्रेत असल्याची माहिती गोदाम पालकयांनी डोणगाव पोलीस स्टेशनला दिली. त्यावरून ठाणेदार घुगे हे त्यांच्या कर्मचार्‍यांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा तपास करण्यास सुरुवात केली. तेव्हा डोणगाव येथील परवीनबी (२२) हीने मृतक सलीमाबी ही तिची आई असल्याचे सांगितल्यावरून मृतक महिलेची ओळख पटली. यासंदर्भात परवीनबी हिने डोणगाव पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यामध्ये नमूद केले आहे की, डोणगाव येथील सलीमाबी गफ्फार शाह (४५) हिचे गावातीलच शे. रियाज शे. महंमद (३२) याच्याशी अनेक दिवसांपासून अनैतिक प्रेम संबंध होते. शे.रियाज हा परवीनबीच्या घरासमोर वारंवार येत असे व शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी द्यायचा. शे.रियाज शे. महमदयाने २७ नोव्हेंबरच्या रात्री ७ वाजता सलीमाबी हिला फोन करून भेटण्यास बोलविले. तेव्हापासून सलीमाबी घरी परतलीच नाही. दरम्यान, सलीमाबी हीचा मृतदेह डोणगाव येथील शासकीय धान्य गोदामाच्या पाठीमागे मिळून आला. याप्रकरणी शे.रियाज शे. महमद याच्याविरुद्ध डोणगाव पोलिसांनी कलम ३0२ भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून, आरोपी मात्र फरार आहे.