शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

कारेगाव येथे घागर मोर्चा

By admin | Updated: May 9, 2017 01:39 IST

महाजल योजना ठरली कुचकामी; पाण्यासाठी महिलांची भटकंती.

कारेगाव : येथील गावकर्‍यांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे येथे कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी येथील महिलांनी शनिवारी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. लाखो रूपये खर्च करून शासनाने कारेगावसाठी महाजल योजना उभारली मात्र, या महाजल योजनेमध्ये झालेल्या अनियमितपणामुळे या योजनेतून पाणी मिळू शकले नाही. त्यामुळे महाजल योजनाही येथे कुचकामी ठरत आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून सुध्दा येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही. कारेगावसाठी ७0 लाख रूपये खर्चुन महाजल योजने अंतर्गत कोनाटीच्या धरणावरुन पाईपलाईन करण्यात आली. पाणी साठविण्यासाठी गावात टाकीही बांधण्यात आली. मात्र, या पाईपलाईन मधून गावाकर्‍यांना एकदिवसही पाणी मिळाले नाही. अखेर गावकर्‍यांनी तंटामुक्तीच्या निधीमधून पाणी साठवविण्यासाठी दुसरी टाकी बांधली. तरी सुद्धा महाजल योजनेचे पाणी गावकर्‍यांना कधी मिळते तर कधी मिळत नाही. महिलांना रात्री बेरात्री मिळेल तेथून पिण्यासाठी पाणी आणावे लागते. अखेर कंटाळलेल्या महिलांनी हातात हंडे घेवून शनिवारी ग्रामपंचायतीवर धडक दिली. यावेळी मिना हाडे, छाया चव्हाण, गयाबाई चव्हाण, जिजाबाई चव्हाण, रत्नमाला आवारे, कालिंदाबाई डव्हळे, लताबाई गुंगे, लंकाबाई गायकवाड, गिताबाई चव्हाण यांच्यासह मोहन हाडे, भास्कर गुंगे, विठ्ठल गायकवाड, सुनिल हाडे, विलास गुंगे, धम्मपाल वानखेडे, दादाराव वानखेडे, शेषराव वानखेडे, गणेश डव्हळे, सुधीर चव्हाण, विष्णू चव्हाण, शेषराव केंधळे हे गावकरी मोर्चात सहभागी झाले होते. आतातरी कारेवाग येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रशासनाने कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी गावकर्‍यांनी यावेळी केली.