शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

खामगाव मुख्य डाकघरासमोर ग्रामीण डाकसेवकांचा १२ व्या दिवशी संप सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 6:26 PM

खामगाव :  ग्रामीण डाक सेवक संघटनांनी २२ मे पासून आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेला बेमुदत देशव्यापी संप १२ व्या दिवशी तेवढ्याच उत्साहाने सुरू असून आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामीण डाकसेवकांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्देदेशातील सुमारे १.३५ लाख शाखा डाकघरे व २.७० लाख ग्रामीण डाकसेवक सद्यास्थितीत बेमुदत संपावर आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील डाकसेवा पुर्णत: ठप्प झाली आहे. ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहेत.२ जुन रोजी मुख्य पोस्ट आॅफीस समोर ग्रामीण डाकसेवकांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले व घोषणा देण्यात आल्या.

खामगाव :  ग्रामीण डाक सेवक संघटनांनी २२ मे पासून आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू केलेला बेमुदत देशव्यापी संप १२ व्या दिवशी तेवढ्याच उत्साहाने सुरू असून आपल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामीण डाकसेवकांनी व्यक्त केला आहे.देशातील ७० टक़्के जनता ही ग्रामीण भागात असून देशातील डाक विभागाचे  जाळे हे शाखा डाकघरांच्या माध्यमातून जुडले आहेत. देशातील सुमारे १.३५ लाख शाखा डाकघरे व २.७० लाख ग्रामीण डाकसेवक सद्यास्थितीत बेमुदत संपावर आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील डाकसेवा पुर्णत: ठप्प झाली आहे. ग्राहकांचे प्रचंड हाल होत आहेत. परंतु केंद्र सरकार जाणीवपुर्वक ग्रामीण डाक सेवकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त होत आहे. ग्रामीण डाक सेवकांच्या रास्त मागण्या शक्य तेवढ्या लवकर निकाली न निघाल्यास ग्रामीण डाकसेवक तीव्र आंदोलन छेडणार आहेत.२ जुन रोजी मुख्य पोस्ट आॅफीस समोर ग्रामीण डाकसेवकांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले व घोषणा देण्यात आल्या. विभागीय सचिव कॉ.प्रभाकर झाडोकार, जी.आर. देशमुख, एस.एस. धोत्रे, किशोर दसोरे, प्रभुदास गव्हांदे यांच्या नेतृत्वात खामगाव उपविभागांतर्गत सर्व शाखा डाकघरातील ग्रामीण डाकसेवक उपस्थित होते. यावेळी संपकाळात मृत्युमुखी पडलेले कॉ. लक्ष्मण सुवासे, कॉ.डी.एल. बिराजदार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. (प्रतिनिधी)

टॅग्स :khamgaonखामगावagitationआंदोलन