खामगाव : टाटा मॅजिक व ऑटो मध्ये भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी सव्वातीन वाजता खामगाव शेगाव रोड वर घडली. या अपघातात 18 प्रवासी जखमी झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.खामगाव शेगाव रोड वरील एस एस डिव्ही ज्ञानपीठ जवळ शेगाव कडून खामगावकडे येणाऱ्या भरधाव टाटा मॅजिकने ऑटोला जोरदार धडक दिली. यामध्ये दोन्ही वाहनातील 18 जण जखमी असून चालकासह 4 जण गंभीर जखमी झाले. सुरवातीला त्यांना खामगाव येथे सामान्य रुग्णालयात प्रथमोपचार करून अकोला येथे पाठविण्यात आले आहे. अपघातात ऑटोचा चुराडा झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.सध्या शेगाव पंढरपुर मार्गाचे बांधकाम सुरू आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. शनिवारी पडलेल्या पावसामुळे या रस्त्यावर जागोजागी जमा झाला आहे. त्यामुळे प्रवाशांनी वाहने सावधानतेने चालविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
खामगाव-शेगाव रोडवर टाटा मॅजिकची ऑटोला धडक, चार जण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 16:17 IST
खामगाव : टाटा मॅजिक व ऑटो मध्ये भीषण अपघात झाल्याची घटना रविवारी दुपारी सव्वातीन वाजता खामगाव शेगाव रोड वर घडली.
खामगाव-शेगाव रोडवर टाटा मॅजिकची ऑटोला धडक, चार जण गंभीर जखमी
ठळक मुद्देशेगाव कडून खामगावकडे येणाऱ्या भरधाव टाटा मॅजिकने ऑटोला जोरदार धडक दिली.दोन्ही वाहनातील 18 जण जखमी असून चालकासह 4 जण गंभीर जखमी झाले. खामगाव येथे सामान्य रुग्णालयात प्रथमोपचार करून अकोला येथे पाठविण्यात आले आहे.