शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

चार गुटखा विक्रेत्यांना अटक

By admin | Updated: January 17, 2015 00:12 IST

लोणार येथे ८३ हजार रुपयांचा माल जप्त.

लोणार (जि. बुलडाणा) : लोणार पोलिसांनी सापळा रचून अवैध गुटखा विक्री करणार्‍यांना रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून २ दुचाकीसह ८३ हजार रुपयांचा गुटखा माल जप्त केला आहे. गुटखा विक्री करणार्‍या चौघांना अटक केल्याची घटना १६ जानेवारी रोजी घडली.शहरात अवैध गुटखा विक्री जोमात सुरु होती. गुटखा विक्रीवर बंदी असतानासुद्धा लोणी मार्गे शहरात अवैध गुटखा येत असल्याची माहिती लोणार पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आकाश शिंदे यांना १६ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता मिळाली. त्यावरुन त्यांनी अवैध गुटखा विक्रेत्यांवर पाळत ठेवली होती. दरम्यान, नीतेश चौधरी, अलताफ खान वलईत खान, शे.जमीर शे.कदीर हे तिघे लोणी मार्गे शहरात गुटखा आणून विक्री करीत असल्याचे समजताच सहायक पोलीस निरीक्षक आकाश शिंदे यांच्यासह पोकाँ संजय जाधव, कैलास चतरकर, शे.शोयब, रवींद्र इंगळे, अतुल पवार, गोविंद होनमने यांनी गुटखा विक्री करणार्‍या तीन जणांना स्थानिक जैन मंदिर परिसरात रंगेहाथ पकडले. त्यानंतर केलेल्या चौकशीवरून उपरोक्त तिघांनी गजानन मापारी यांच्याकडून गुटखा घेतल्याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ गजानन मापारी यासदेखील अटक केली. अवैधरीत्या गुटखा जवळ साठवून त्याची वाहतूक व विक्री केल्यावरुन लोणार पोलिसांनी नीतेश चौधरी, अलताफ खान वलईत खान, शे.जमीर शे.कदीर, गजानन मापारी या चार जणांविरुद्ध कलम ३२८ अन्न सुरक्षा आणि औषधनुसार कारवाई करुन गुन्हा दाखल केला आहे. गुटख्याची अवैध विक्री करणार्‍यांविरुद्ध कारवाई होताच शहरातील पानटपर्‍या बंद करून गुटखा विक्रेत्यांनी पळ काढला होता, तर काही ठिकाणी चोरीछुपे १0 रुपयेपेक्षा अधिक दराने गुटखा पुड्यांची विक्री केली गेली.