शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
6
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
7
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
8
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
9
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
10
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
11
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
12
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
13
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
14
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
15
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
16
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
17
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
18
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
19
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
20
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाचा मातीबंधारा फुटला

By admin | Updated: July 25, 2014 00:00 IST

हनवतखेड बिटमध्ये बांधण्यात आलेला मातीबंधारा गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने फुटल्याने शेतकर्‍यांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले.

धानोरा महासिध्द : जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या धानोरा हनवतखेड रस्त्यावर हनवतखेड बिटमध्ये बांधण्यात आलेला मातीबंधारा गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाने फुटल्याने शेतकर्‍यांचे हजारो रूपयांचे नुकसान झाले. वनविभागाचेवतीने हनवतखेड बिटमध्ये यावर्षीच लाखो रूपये खर्च करून माती बंधारा तयार करण्यात आला. परंतु गेल्या दोन दिवसात धो धो पडणार्‍या पहिल्याच पावसाने सदर बंधारा फुटला. त्यामुळे बंधार्‍याखाली वास्तव्यास असलेल्या शेतकर्‍यांच्या घराचे व शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. घरामधील संसारोपयोगी साहित्य, रासायनिक खत, शेती साहित्य (अवजारे) व दुधाच्या दोन गायी मृत्यूमुखी पडल्या. तसेच २ एकर शेती खरडून मोठय़ा कष्टाने जगविलेले कपाशीचे पीक जमीनदोस्त झाले. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी आज २४ रोजी आ.डॉ.संजय कुटे यांची भेट घेवून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. यावर त्यांनी संबंधित अधिकार्‍याला योग्य ती कार्यवाही करून शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानाची पंचनामे करून आर्थिक मदत देण्याच्या सूचना दिल्या. नुकसानग्रस्त शेतकरी गट क्र.९२, ९३, ९४ मधील ईश्‍वर निना मोहीते, खुशाल भिलाला, राजु अलासे व श्रीकृष्ण लक्ष्मण वानखडे यांनी या नुकसानीबाबत तहसिलदार, वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निवेदन देवून नुकसान भरपाईची मागणी केली आहे.