शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना शस्त्रासह पाच जण ताब्यात

By admin | Updated: July 3, 2015 23:48 IST

बुलडाणा जिल्ह्यातील धामणगाव बढे येथील घटना; ५ लाखांचा माल जप्त.

मोताळा (जि. बुलडाणा): धामणगाव बढे पोलिसांनी २ जुलैच्या रात्री पेट्रोलिंग करीत असताना, पिंपळगाव देवी फाट्यावर संशयितरित्या वावरत असलेल्या एका क्रूझर गाडीमधून धारदार शस्त्रासह पाच जणांना ताब्यात घेतले. अटक केलेल्या आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता, त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धामणगाव बढे पोलीस स्टेशनपासून १ किमी अंतरावरील पिंपळगाव देवी फाट्यावर २ जुलैच्या रात्री पेट्रोलिंग करीत असताना, पेट्रोलिंग पथकातील पोकॉ. तारांचद राठोडसह इतर कर्मचार्‍यांना क्रूझर क्रमांक एम. एच. २८ व्ही ३९५0 या वाहनामध्ये काही तरुण संशयितरित्या वावरत असल्याच्या हालचाली दिसल्या. दरम्यान, वाहनामधील १0 ते ११ जणांची चौकशी केली असता, अवैधरित्या विनापरवाना दोन धारदार मोठे कोयते व पाच नग फायबरचे दांडे पाच जणांजवळ मिळून आले. यावरून तपास अधिकारी सपोनि सेवानंद वानखडे यांनी कैलास प्रल्हाद पिंपळे (वय २४) रा. जगदंबा नगर बुलडाणा, प्रवीण हर्षवर्धन गवई (वय २३) रा. विजय नगर सुंदरखेड बुलडाणा, राजकुमार अजय सोनटक्के (वय १८) रा. फॉरेस्ट कॉलनी बुलडाणा, राहुल गौतम खरे (वय २३) रा. विजय नगर बुलडाणा व विशाल दिलीप जाधव (वय २२) रा. शांतीनगर सुंदरखेड बुलडाणा यांना ताब्यात घेतले. या प्रकरणी पोकॉ. ताराचंद राठोड यांच्या फिर्यादीवरून पाच जणांविरुद्ध कलम ४, २५, भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ प्रमाणो विनापरवाना अवैधरित्या धारदार शस्त्र बाळगणे व गुन्हे करण्याचे उद्देशाने वावरण्याप्रकरणी गुन्हे दाखल करून अटक केली. आरोपीक डून क्रूझर किं मत ५ लाख रुपये, २ कोयते किंमत १ हजार, ५ नग फायबर दांडे किंमत पाचशे रुपये असा एकूण ५ लाख १ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींच्या तपासकामी ठाणेदार वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. माधव पेटकर, पोकॉ. शिवशंकर वायाळ, पोकॉ. ज्ञानदेव डाबेराव, पोकॉ. गणेश वाघ, पोकॉ. शशिकांत शिंदे, पोकॉ. अशोक येरळीकर पुढील तपास करीत आहे