पाच न्यायाधीशांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2017 01:39 IST2017-05-01T01:39:27+5:302017-05-01T01:39:27+5:30

बुलडाणा- बदल्यांच्या धामधुमीतच राज्यातील २४२ न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील पाच न्यायाधीशांचा समावेश आहे.

Five Judges Transfer | पाच न्यायाधीशांच्या बदल्या

पाच न्यायाधीशांच्या बदल्या

बुलडाणा : जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे सीईओ, अप्पर पोलीस अधीक्षक आदी महसूल व पोलीस प्रशासनाच्या बदल्यांच्या धामधुमीतच राज्यातील २४२ न्यायाधीशांच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये जिल्ह्यातील पाच न्यायाधीशांचा समावेश आहे.
बुलडाणा येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस. कलोती यांची मुंबई येथील सीटी सिव्हील न्यायालयात बदली करण्यात आली आहे.
तसेच एस.डी.भगत यांची ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे बदली करण्यात आलेली आहे. एस.सी.सिरसाट यांची औरंगाबाद येथे बदली झाली आहे. तसेच पी.एल.गजभीये यांची धुळे येथे बदली करण्यात आली आहे. खामगावचे डी.एन.सुरोशे यांची बीड येथे बदली करण्यात आली आहे. या पाचही न्यायाधीशांच्या जागी बाहेरील जिल्ह्यातून न्यायाधीश येणार आहेत. ठाणे येथील आर.एम. कुळकर्णी यांची बुलडाणा येथे बदली करण्यात आलेली आहे. पालघर ठाणे येथील ए.डी.क्षीरसागर, बीडचे एस. एस. शर्मा व जयसिंगपूर कोल्हापूर चे एन.आर.तळेकर यांची बुलडाणा येथील जिल्हा न्यायालयात बदली करण्यात आलेली आहे. तसेच औरंगाबादचे एम.जी.चव्हाण हे खामगाव न्यायालयात रुजू होणार आहेत.

Web Title: Five Judges Transfer