शहरं
Join us  
Trending Stories
1
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
2
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
3
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
4
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
5
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
6
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
8
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
9
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
10
नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती
11
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
12
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
13
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
14
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
15
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
16
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
17
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
18
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
19
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
20
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
Daily Top 2Weekly Top 5

पाच दिवसानंतर उघडली शाळा शाळेला

By admin | Updated: July 3, 2014 22:57 IST

पहिल्याच दिवशी ठोकले होते कुलूप

शेलगाव देशमुख : मेहकर तालुक्यातील विश्‍वी येथील जि.प.मराठी पूर्व शाळेला २६ जून रोजी शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रलंबीत मागण्यांसाठी कुलूप ठोकण्यात आले होते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आज शाळेचे कुलूप तोडले, त्यामुळे तब्बल पाच दिवसानंतर शाळा खुली झाली.
प्राप्त माहितीनुसार, विश्‍वी येथील जि.प.मराठी पूर्व माध्यमिक शाळेच्या जमीन हर्रासीची रक्कम जि.प.मध्ये जमा होऊन शाळेच्या विकासासाठी परत मिळत होती. परंतु २00५ पासून जि.प.कडे ३ लाख ६३ हजार १0७ रुपये पडून असल्याने सदर रकमेचा उपयोग शाळेच्या विकासासाठी करण्यात यावा, म्हणून शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप देशमुख यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन हर्रासी मोबदला परत देण्यात यावा, अशी १२ जून रोजी मागणी केली होती. सदर रक्कम परत न मिळाल्यास शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप ठोकून शाळा बंद करण्याचा इशारा दिला होता. परंतु संबंधित अधिकार्‍यांनी या बाबीकडे दुर्लक्ष केल्याने २६ जून रोजी चिमुकल्यांना शाळेत जाता आले नाही. तर चक्क सतत पाच दिवस शाळा ग्रामपंचायतच्या व्हरांड्यामध्ये व सार्वजनिक वाचनालयामध्ये भरविण्यात आली होती. परंतु विद्यार्थ्यांंना शाळेच्या पहिल्याच दिवसाचा आनंद लुटता आला नाही. तसेच घाईघाईत नवागतांचे स्वागत आटोपून शिक्षकांना आपले विद्यार्थी ग्रामपंचायतमध्ये बसवावे लागले. पाच दिवसाच्या कालावधीमध्ये मेहकर तालुका गटशिक्षण अधिकारी अथवा इतर अधिकारी यांनी मुख्याध्यापकांनी माहिती देऊनही साधी भेट सुद्धा दिली नाही. शिक्षण प्रक्रियेत नवनवे प्रयोग करुन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण करण्याचे कार्य करणारे गटशिक्षण अधिकारी किशोर पागोरे यांनी शाळेला भेटही दिली नाही, असे दिसून येते. मात्र शेवटी भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांंनी गेटचे कुलूप तोडत असल्याचे निवेदन १ जुलै रोजी प्रशासनाकडे दिले. त्यानंतर भरिप बहुजन महासंघाचे तालुका उपाध्यक्ष रामराव राठोड यांच्या नेतृत्वात सदर शाळा विद्यार्थ्यांंसाठी खुली करण्यात आली. यावेळी त्र्यंबक खंडारे, मुलचंद जाधव, पंजाब सिरसाट, सुरेश जाधव, रामदास मांजरे, संतोष आडे, मानिक राठोड, शेषराव आडे, गणेश जाधव, जितेश जाधव, उमेश चव्हाण, राजू जाधव, मदन अंभोरे, सुनिल राठोड, विष्णू जाधव, शाम वाघमारे, निलेश राठोड, रामराव जाधव व सुभाष जाधव यांचेसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी ५ दिवसापासून आपल्या शाळेपासून वंचित असलेल्या निरागस चिमुकल्यांना आपली शाळा मुक्त झाल्याचा आनंद दाटून आला. मुख्याध्यापक पी.एन.गाढे यांनी गावकर्‍यांचे आभार मानले.