शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

ज्ञानगंगात अभयारण्यात प्रथमच ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे होणार प्राण्यांची गणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 11:31 AM

Dnyanganga abhayaranya ज्ञानगंगा अभयारण्यात १७० ट्रॅप कॅमेरे लावण्यात येत असून प्रती दोन चौरस कि.मी.वर एक याप्रमाणे कॅमेरे लावण्यात येतील.

ठळक मुद्देचार मार्चपासून प्रत्यक्षात या गणनेस प्रारंभ होईल.अभयारण्याची अत्यंत महत्त्वाचीही माहिती यामध्ये मिळेल.

- नीलेश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : भारतीय वन्यजीव संस्थेचे डॉ. बिलाल हबीब आणि महाराष्ट्र वनविभागाच्या अर्थसहाय्यातून ‘लॉगटर्म मॉनिटरिंग ऑफ टायगरर्स’ या उपक्रमातंर्गत ज्ञानगंगा अभयारण्यात प्राण्यांची ट्रॅप कॅमेऱ्याद्वारे प्रथमच गणना करण्यात येणार आहे. चार मार्चपासून प्रत्यक्षात या गणनेस प्रारंभ होईल, असे सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. प्रामुख्याने बिबट व वाघ यांच्या शरीरावरील खुणांवरून विशिष्ट क्षेत्रात किती बिबटे व वाघ आहेत हे छायाचित्रांच्या सहाय्याने या गणनेतून स्पष्ट होईल. यासोबतच संबंधित पाण्यांची या माध्यमातून एक ओळखही वन्यजीव विभागाकडे (आयडी) निर्माण होण्यास मदत होईल. ३ मार्च जागतिक वन्यजीव दिन आहे. त्यानुषंगाने माहिती घेतली असता ही बाब समोर आली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प आहे. त्यातंर्गत ज्ञानगंगा अभयारण्याचा समावेश आहे. त्यात यावर्षीप्रथमच अशा पद्धतीने प्राणिगणना होणार आहे. जवळपास २५ दिवस ज्ञानगंगा अभयारण्यात या पद्धतीने बिबट व वाघाचे छायाचित्र घेण्यात येऊन शरीरावरील खुणांवरून त्यांची आयडी तयार केली जाईल. या गणननेतून ज्ञानगंगा अभयारण्यातील तृणभक्षी प्राणी, वाघ, बिबट यांची अचूक माहिती काढण्यास मदत मिळणार आहे. त्यामुळे ही गणना महत्त्वाची आहे. सोबतच अभयारण्यातील कोणत्या भागत वाघ, बिबट्यांचा वावर आहे. तेथील तृणभक्षी प्राणी किती हे ही स्पष्ट होण्यास मदत होईल. अभयारण्याची अत्यंत महत्त्वाचीही माहिती यामध्ये मिळेल.

अभयारण्यात लागणार १७० कॅमेरेज्ञानगंगा अभयारण्यात त्यादृष्टीने १७० ट्रॅप कॅमेरे लावण्यात येत असून प्रती दोन चौरस कि.मी.वर एक याप्रमाणे कॅमेरे लावण्यात येतील. या पद्धतीचे सर्वेक्षण तथा गणना ही किचकट प्रक्रिया आहे. त्यामुळे जवळपास २५ दिवस यापद्धतीने येथे माहिती संकलित केली जाणार आहे.

ट्रॅन्जेक्ट सर्वेअभयारण्यातील तृणभक्षी प्राण्यांचाही सहा दिवस ट्रॅन्जेक्ट सर्वे करण्यात येणार आहे. चार मार्च पासून त्यासही प्रारंभ होईल. यामध्ये प्रत्यक्ष जंगलामध्ये दोन किमीच्या रेषेत पाहणी करून दिसून आलेले प्राणी व तत्सम माहिती संकलित करून तृणभक्षी प्राण्यांची गणना यात करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मेळघाट टायगर फाऊंडेशन अंतर्गत हे काम होत आहे.

टॅग्स :dnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्यwildlifeवन्यजीवbuldhanaबुलडाणा