शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत

By admin | Updated: September 30, 2015 00:32 IST

दे.राजा येथील गणेशोत्सवात सहभागी मंडळांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत मदत देत आदर्श स्थापित केला.

देऊळगावराजा (जि. बुलडाणा) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी विविध गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांच्या सत्कारासह आत्महत्याग्रस्त कुटुंबांसाठी आर्थिक मदत सोमवारी पाठविण्यात आली. यासाठी संतोष अंभोरे मित्रमंडळ व आदिशक्ती ग्रूपने पुढाकार घेतला. सर्वत्र दुष्काळाचे सावट असून, गणेश मंडळांनी अनावश्यक खर्च टाळावा. अनावश्यक बाबींवर होणारा खर्च टाळून नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना आर्थिक् मदत देण्याचे काम सुरू केलेले आहे. या पृष्ठभूमिवर स्थानिक संत सावता सार्वजनिक गणेश मंडळाच्यावतीने रा.कॉं.तालुकाध्यक्ष दीपक बोरकर यांच्या नेतृत्वात नाम फाउंडेशनच्या बँक खात्यात १२ हजार १११ रुपयांची आर्थिक मदत पाठविण्यात आली. गेल्या दहा दिवसात अनेक गणेश मंडळांकडून गणपतीसमोर विविध कार्यक्रम आयोजित केले. त्या गणेश मंडळांचा उत्साह वाढविण्याकरिता अंभोरे मित्रमंडळ व आदिशक्ती ग्रूपच्यावतीने यावर्षीपासून सार्वजनिक गणेशोत्सवात प्रत्येक गणपती मंडळाला सन्मानित करण्यासाठी गणेशोत्सव सत्कार समितीची स्थापना करुन गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणार्‍या गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांचा सन्मान करण्यात आला. त्यांना श्रींची आकर्षक मूर्ती, शाल, टोपी भेट स्वरूपात दिली. याप्रसंगी गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संतोष अंभोरे मित्रमंडळ व आदिशक्ती ग्रूपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.