शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
5
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
6
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
7
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
8
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
9
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
10
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
11
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
12
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
13
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
14
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
15
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
16
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
17
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
18
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
19
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
20
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण

अखेर राहेरी पूल पुनर्निर्माणाचा मार्ग मोकळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 12:15 PM

Reconstruction of Raheri Bridge येत्या आठ दिवसांत या पुलाच्या बांधकामास प्रारंभ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  भारत माला योजनेतंर्गत समाविष्ट असलेल्या नागपूर-मुंबई राष्ट्रीय मार्गावरील सिंदखेडराजा तालुक्यात येत असलेल्या व खस्ता हालत झालेल्या ऐतिहासिक राहेरी पुलाच्या पुनर्निर्माणाचा मार्ग मोकळा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि अन्न व अैाषध प्रशासनमंत्री यांनी मुंबईत घेतलेल्या एका बैठकीत या पुलाच्या उभारणीसाठी मान्यता देण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत या पुलाच्या बांधकामास प्रारंभ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.        गेल्या चार ते पाच वर्षांपासून या पुलाचे बांधकाम रखडलेले होते. कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या एका दुर्घटनेनंतर राज्यातील पुलांचेही स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. त्यावेळी राहेरी पुलाचे आर.  के. गुप्ता आणि अनुप सूर्यवंशी यांनी संरचनात्मक ऑडिट करत धोकादायक बनलेल्या या पुलावरून जड वाहतूक बंद करण्याचे सुचविले होते. तसेच पुलाच्या सुपर स्ट्रक्चरची पुनर्बांधणी करण्याचे स्पष्ट केले होते. मात्र, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या पुलाच्या बांधकामाचा प्रश्न रखडला होता.त्यातच नागपूर-मुंबई हा मार्ग दर्जोन्नत होवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७३५ सी झाला होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अैारंगाबाद विभागातंर्गत हा रस्ता आला आहे. या रस्त्यावरच खडकपूर्णा नदीवर राहेरी गावानजीक  हा पूल आहे. त्याची झालेली दुरवस्था व धोकादायक स्थिती पाहता त्याचे तातडीने पुनर्निर्माण करणे काळाची गरज बनली होती. त्यानुषंगाने दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीस पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर या पुलाच्या पुनर्निर्माणास मान्यता देण्यात आली आहे. 

सहा कोटींचा खर्च अपेक्षितविशेष दुरुस्ती कार्यक्रमातंर्गत या पुलासाठी  ६ मार्च २०१९ रोजी या पुलासाठी ९ कोटी ८५ लाख रुपयांच्या निधी खर्चास मान्यता देण्यात आली होती. दरम्यान, या पुलाच्या कामासोबतच  राहेरी येथे वळणमार्गही प्रस्तावित असल्याची माहिती आहे. त्यानुषंगाने वळणमार्गासाठी ६ कोटी २१ लाख रुपये तर पुलाच्या सुपल स्ट्रक्चरसाठी पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

४१ किमीचा फेरा वाचेलहा पूल पूर्णत्वास गेल्यानंतर अैारंगाबाद तथा मेहकरकडून येणाऱ्या वाहनांचा तब्बल ४१ किमींचा फेरा वाचणार आहे. सोबतच सिंदखेडराजा व लोणार तालुक्यातील व्यावसायिक व सामान्य नागरिक यांचे आर्थिक नुकसान टळून या मार्गावर रोजागारनिर्मितीस अधिक चालना मिळणार आहे. त्यानुषंगाने पाठपुरावा करून पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दोन वर्षांपासून रखडलेले हे काम मार्गी लावले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाDr. Rajendra Shingeडॉ. राजेंद्र शिंगणे