भरधाव ट्रक गॅरेजमध्ये घुसला

By Admin | Updated: August 26, 2015 23:49 IST2015-08-26T23:49:20+5:302015-08-26T23:49:20+5:30

खामगावातील शेगाव नाक्याजवळील घटना.

Ferryman entered the truck garage | भरधाव ट्रक गॅरेजमध्ये घुसला

भरधाव ट्रक गॅरेजमध्ये घुसला

खामगाव : भरधाव असलेल्या ट्रकवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव ट्रक गॅरेजमध्ये घुसल्याची घटना स्थानिक शेगाव नाक्यावर २५ ऑगस्टचे रात्रीदरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. ट्रक क्रं.जीजे 0३ एटी ३५८७ हा मंगळवारी रात्री शेगावकडून खामगावकडे येत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर ट्रक शेगाव नाक्यावरील पंकज ठाकूर यांच्या गॅरेजमध्ये घुसला. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने गॅरजमध्ये कुणीही नव्हते. याप्रकरणी शहर पोलिसांनी ट्रकचालक हिराभाई कानाभाई भाटीया (४२) रा.पिंडारा गुजरात यांच्याविरुध्द कलम २७९,४२७ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Ferryman entered the truck garage