मलकापुरात शेतक-यांचा मोर्चा

By Admin | Updated: June 10, 2015 02:47 IST2015-06-10T02:47:53+5:302015-06-10T02:47:53+5:30

कर्ज पुनर्गठनाची मागणीसाठी शेतक-यांनी व्यक्त केलां रोष!

Farmer's Front in Malkapur | मलकापुरात शेतक-यांचा मोर्चा

मलकापुरात शेतक-यांचा मोर्चा

मलकापूर ( जि. बुलडाणा) : शेतकरी आणि बारा बलुतेदारांच्या विविध समस्यांसाठी मंगळवारी राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात व दत्ताजी हिवाळे यांच्या मार्गदर्शनात शेतकरी, शेतमजूर व बारा बलुतेदारांच्या प्रतिनिधींचा एक विशाल मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाद्वारे एकूण १९ मागण्यांचे निवेदन जाहीर पत्रकात छपून ते वाटप करण्यात आले होते.
तेच निवेदन शासनास मोर्चातील प्रतिनिधीमार्फत देण्यात आले. यात प्रामुख्याने शेतकरी हिताच्या अनेक मागण्यांवर विशेष भर देऊन आग्रह धरण्यात आला.
याच सभेत महाराष्ट्र कृषक समाजाचे संस्थापक माजी खासदार व माजी कृषिमंत्री दिवंगत गोविंदराव आदिक यांना त्यांनी शेती, शेतकरी व शेतमजूर यांच्यासाठी केलेल्या कार्याची माहिती देऊन अतिशय भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व देवेंद्र वानखेडे यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Farmer's Front in Malkapur