शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून हाणामारी

By admin | Updated: July 3, 2015 23:54 IST

मेहकर आणि मातोळा तालुक्यातील घटनां.

डोणगाव (जि. बुलडाणा): मेहकर तालुक्यातील द्रुगबोरी येथे शेतीच्या वादातून करण्यात आलेल्या मारहाणीत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना १ जुलै रोजी घडली. द्रुगबोरी येथील प्रवीण ऊर्फ बाळू रमेश शिंदे व गजानन सुखदेव डाखोरेसह सात जण यांच्यात शेतीच्या वादातून हाणामारी झाली. त्यामध्ये गजानन डाखोरे याने प्रवीण रमेश शिंदे याच्या अंगावर गरम पदार्थ फेकून जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामध्ये प्रवीण शिंदे गंभीर जखमी झाले. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी गजानन सुखदेव डाखोरे, बेबी डाखोरे, नागेश डाखोरे, बाळू भिकाजी डाखोरे, मारोती बंडू इंगळे, राजू नांदे शेषराव आश्रू शिंदे (रा. नागेशवाडी) यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार एस.आर. निचळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तपोवन येथे क्षुल्लक कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना २ जुलैच्या रात्री घडली. परस्परविरोधी फिर्यादींवरून पोलिसांनी दोन्ही गटांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी सुनील कमलाकर पाटील (रा. तपोवन) हे येथील सोपान पाटील यांच्या किराणा दुकानावर गेले असता, किरण प्रभाकर चतारे याने सुनील पाटील यांच्याशी वाद झाला. दरम्यान, सुनील पाटील समजाविण्यासाठी गेले असता, किरण चतारे व त्याचा भाऊ सुधाकर चतारे यांनी संगनमताने सुनील पाटील यांना फायटरने वार करून जखमी केले. सुनील पाटील यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी किरण चतारे व सुधाकर चतारे यांच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३२४, ४0५, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. दुसरीकडे किरण प्रभाकर चतारे यांनी तक्रार दिली की, सोपान पाटील यांच्या किराणा दुकानावर भावाच्या मुलीला घेऊन गेलो असता, उपस्थित सुनील कमलाकर पाटील, जयेश सुनील पाटील, विजय सुनील पाटील व कैलास बाजीराव पाटील यांनी डोक्यात कुर्‍हाडीचा दांडा मारला व घरी येऊन आईला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.