शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

सखी मतदान केंद्रावर महिलांचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 1:32 PM

तदान केंद्रावरील सुविधांमुळे मतदानाबाबत महिलांमध्ये उत्साह दिसून आला.

खामगाव: येथील मोहता महिला विद्यालयात महिलांसाठी सखी मतदान केंद्राची उभारणी निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात आली. या मतदान केंद्रावरील सुविधांमुळे मतदानाबाबत महिलांमध्ये उत्साह दिसून आला.विधानसभा निवडणुकीसाठी २१ आॅक्टोबर रोजी मतदान झाले. खामगाव विधानसभा मतदारसंघात खामगाव शहरात मोहता महिला महाविद्यालयात सखी मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली. तर याच परिसरात नॅशनल हायस्कूलमध्ये आदर्श मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली. दोन्ही मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे मतदारांमध्ये सकाळपासूनच उत्साह दिसून आला. सखी महिला मतदान केंद्रावर उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉर्इंटचे महिलांना विशेष आकर्षण दिसून आले. महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावत सेल्फी घेतला. नवमतदारांमध्येही प्रचंड उत्साह दिसून आला. भारतीय लोकशाही मजबूत करण्यासाठी जास्तीत मतदान व्हावे, यासाठी निवडणूक विभागाकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी सखी मतदार केंद्र, आदर्श मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली. सखी मतदान केंद्रावर स्वच्छता गृह, पाण्याची व्यवस्था मतदारांसाठी करण्यात आली. नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी सेल्फी पॉर्इंटसह मतदान केंद्राची सजावट करण्यात आली. महिलांनी जास्तीत जास्त मतदान करावे, यासाठी बालसंगोपन गृह येथे उभारण्यात आले होते. या मतदान केंद्रावर महिला कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली. नॅशनल हायस्कूलमध्ये उभारण्यात आलेल्या आदर्श मतदान केंद्रावरही मतदारांना सर्वच सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली. दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांनी मदत केली. दरम्यान दुपारी साडेबारा वाजेपर्यंत सखी मतदार केंद्र क्रमांक ११२ वर एकूण ७३१ मतदारांपैकी १५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर आदर्श मतदान केंद्र क्रमांक ११३ वर ११३ पुरूष व १२७ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. नगराध्यक्षांसह महिलांनी घेतला सेल्फी!सखी मतदार केंद्रावर सकाळीच नगराध्यक्षा अनिता डवरे यांच्यासह महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी नगराध्यक्षांसोबत सेल्फी पॉर्इंटवर महिलांना सेल्फी घेतला. दिवसभर या मतदान केंद्रावर महिलांनी मतदानासाठी गर्दी केली. दिव्यांग बांधवांनी बजावला मतदानाचा हक्क!खामगाव शहरात दिव्यांग बांधवांनीही उत्साहात मतदान केले. लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन पवन मेतेकर, अमोल भवरे, मनोज नगरनाईक यांनी केले. मतदारांनी मतदानाचा विषय गांभीर्याने घ्यावा. लोकशाहीसाठी मतदान आवश्यक आहे. मतदानापासून कोणीही वंचित राहणार नाही, याची काळजीही प्रत्येकाने घेण्याची गरज आहे.वैशाली घोरपडे, मतदार खामगाव. सखी मतदान केंद्रावरील सुविधांमध्ये मतदानाबाबत विशेष आकर्षण वाटले. येथे मतदारांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा बघता, आम्हा युवतींमध्ये मतदानाबाबत उत्साह आहे. सर्वांनीच मतदान करावेपल्लवी पाटील, युवा मतदार खामगाव.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019khamgaon-acखामगाव