शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

गावकारभारी निवडण्यासाठी मतदारांमध्ये उत्‍साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:30 IST

मेहकर : शुक्रवारी सकाळी ७.३० वाजतापासून मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. महिला व पुरुष मतदार आपला मतदानाचा ...

मेहकर : शुक्रवारी सकाळी ७.३० वाजतापासून मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. महिला व पुरुष मतदार आपला मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी घराबाहेर पडल्याचे दिसून आले. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १४२ मतदान केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली होती. ग्रामपंचायतींच्या ३१३ जागांसाठी एकूण ७४९ उमेदवार रिंगणात होते.

मेहकर तालुक्यात ३९ ग्रामपंचायतींच्या सर्वात्रिक निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. गल्लीतील पत या निवडणुकीवर अवलंबून असल्यामुळे गावपुढाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणूक जिंकण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावल्याचे दिसून आले. मेहकर तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींमध्ये पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत ग्रामस्थांनी उत्‍स्फूर्त सहभाग नोंदविला असून, सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ८०.९५ टक्के मतदान झाले. ग्रामीण भागातील महत्त्वपूर्ण निवडणूक म्हणून ग्रामपंचायत निवडणुकीकडे पाहिले जाते. मतदारांनीही या निवडणुकीमध्ये उत्‍स्फूर्त सहभाग नोंदवित कासारखेड, पांगरखेड मादणी, मोहना बु. मोळा, मांडवा समेत डोंगर, शेलगाव देशमुख, शेलगाव काकडे, शेंदला, घाटनांद्रा, डोणगाव, फैजलापूर, लोणी गवळी, शिवाजीनगर, विवेकानंद नगर, विश्वी, हिवरा खुर्द, देऊळगाव माळी, दे. साकर्शा, दादुलगव्हाण, आरेगाव, अंजनी बु., जवळा, वरूड, ब्रह्मपुरी, बोरी, बोथा, सारशिव, सावत्रा, सावंगीवीर, गजरखेड, गणपूर, नायगाव दत्तापूर, गोमेधर, गोहोगाव, नागापूर, कनका बु., उमरा, शहापूर या ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान पार पडले. सकाळपासूनच मतदारांच्या मतदानासाठी ग्रामीण भागातील मतदारांनी मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे पाहावयाच मिळाले. गावचा कारभार हाती घेण्यासाठी अनेक ठिकाणी चुरस पाहावयास मिळाली. उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, १८ जानेवारी रोजी निकाल लागणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र, तालुक्यातील अनके मतदान केंद्रांवर यांचे पालन होताना दिसून आले नाही. अनेक मतदारांनी मास्क वापरला नव्हता. त्‍यामुळे प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची पायमल्ली झाल्याचे दिसून आले.

दिव्यांगांनी बजावला हक्क

या ग्रामपंचायत निवडणुकीत वृद्ध व आजारी असलेल्या ज्येष्ठांनी मतदानाचा हक्क बजाविला. आपल्या मतदान हक्काची कर्तव्य पूर्तता करताना कुठल्याचे प्रकारची हयगय केली नसल्याचे यावेळी दिसून आले.