शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

विजेचे बिल थकवले, नांदुऱ्याचे पाणी तोडले; ऐन उन्हाळ्यात नांदुरा शहरावर पाणी टंचाईचे गडद सावट

By अनिल गवई | Updated: March 30, 2024 15:42 IST

या कारवाईमुळे नांदुरा शहरातील पाणी पुरवठा ठप्प झाल्याने शहरात एकच खळबळ माजली असून वीज जोडणी कापल्याची नामुष्की नांदुरा पालिकेवर ओढवली आहे.

खामगाव: नांदुरा शहरासाठी जीवन वाहिनी ठरणार्या नांदुरा शहर पाणी पुरवठा योजनेची वीज जोडणी महावितरणने कापली आहे. कोट्यवधी रूपयांची वीज बिल थकल्याने महावितरणने ही कारवाई केली. या कारवाईमुळे नांदुरा शहरातील पाणी पुरवठा ठप्प झाल्याने शहरात एकच खळबळ माजली असून वीज जोडणी कापल्याची नामुष्की नांदुरा पालिकेवर ओढवली आहे.प्राप्त माहितीनुसार, नांदुरा शहरातील नागरिकांना खामगाव तालुक्यातील गेरू माटरगाव येथील धरणावरून पाणी पुरवठा करण्यात येतो. यासाठी नांदुरा येथील जलशुध्दीकरण केंद्र ते गेरू माटरगाव धरणापर्यंत पाइपलाइन टाकण्यात आली आहे. जलशुध्दीकरण केंद्रात शुध्द केलेले पाणी नगर पालिका पाणी पुरवठा योजनेद्वारे विविध वार्डातील तसेच वस्तींतील नळांना पुरविण्यात येते. दरम्यान, गत काही वर्षांत पाणी पुरवठा योजनेतंर्गत महावितरणचे कोट्यवधी रूपयांचे देयक थकले आहे. नागरिकांकडून पाणी पट्टीची वसुली थकल्याने पालिकेने वीज वितरणच्या वीज बिलाचा भरणा केला नाही म्हणून, महावितरणच्या अधिकार्यांनी कनिष्ठ अभियंता अनिल जयस्वाल यांच्या नेतृत्वात नगर पालिका पाणी पुरवठा योजनेची वीज जोडणी कापली. त्यामुळे पालिका प्रशासनासोबतच नियमित पाणी पट्टीचा भरणा करणारे नागरिकही अडचणीत सापडले आहेत.

शहराचा पाणी पुरवठा ठप्पकोट्यवधी रुपयांच्या थकीत बिलासाठी वीज जोडणी कापण्यात आली. मार्च महिन्याच्या अखेरीस उन्हाचा जोर वाढत असतानाच, शहराचा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. शहरातील नियमित कराचा भरणा आणि पाणी पट्टी धारकांनाही पाणी पुरवठा करण्यास आता पालिका असमर्थ ठरत आहे.थकीत वसुलीमुळे पालिका वेठीस -कोट्यवधी रुपयांची पाणी पट्टी नागरिकांकडे थकली आहे. अशा परिस्थितीत पाणी पुरवठा योजना चालविणे नांदुरा नगर पालिका प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत असतानाच आता पाणी पुरवठा योजनेची वीज जोडणीही कापण्यात आली आहे. त्यामुळे नगर पालिका प्रशासन संकटात सापडले आहे.थकीत वीज बिलासाठी पाणी पुरवठा योजनेची जोडणी कापण्यात आली आहे. ही वस्तुस्थिती आहे. यापुढे पाणी पट्टीचा नियमित भरणा करणार्यांनाही पाणी पुरवठा करणे अशक्य आहे. नागरिकांनी पाणी पट्टी भरून सहकार्य केल्यास परिस्थिती सुधारता येईल.नीरज नाफडे, पाणी पुरवठा अभियंता, नगर परिषद, नांदुरा... 

टॅग्स :electricityवीजWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई