शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

दुष्काळात महावितरणच्या वसुलीचा ‘शॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 6:47 PM

बुलडाणा:  मार्च एंन्डीगच्या तोंडावर थकबाकी वसूलीसाठी गावोगावी महावितरणचे पथक सध्या फिरत आहे. परंतू दुष्काळात महावितरणच्या वसुलीचा शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांना ‘शॉक’ बसत आहे

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा:  मार्च एंन्डीगच्या तोंडावर थकबाकी वसूलीसाठी गावोगावी महावितरणचे पथक सध्या फिरत आहे. परंतू दुष्काळात महावितरणच्या वसुलीचा शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांना ‘शॉक’ बसत आहे. परिणामस्वरूप कर्मचारी व ग्राहकांमध्ये वाद वाढत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक पाणीपुरवठा, पथदिवे यासह शासकीय कार्यालय व इतर सार्वजनिक ठिकाणचे लाखो रुपयांचे वीज देयक थकलेले आहे. थकीत वीजबिलांचा भरणा न करणाºया ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने १ मार्चपासून तीव्र केली आहे. वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्यामुळे महावितरणला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे दरमहा वीजबिलांसह वीजग्राहकांकडे असलेल्या थकबाकीची वसुली करण्यासाठी महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे.   महावितरणच्या वरीष्ठ अधिकाºयांसह सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, क्षेत्रीय अभियंत्यांनी वसुली व थकबाकीदारांकडे आपले लक्ष केंद्रीत केले आहे. परंतू सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने सर्वसामान्य ग्राहकांसह शेतकरी वर्गही थकबाकी भरू शकत नाहीत. त्यामुळे महाविरतणला या वसूली मोहीमेत मोठ्या अडचणी येत आहेत. जिल्ह्याचे अर्थचक्र हे शेतीवर अवलंबुन आहे. परंतू अत्यल्प पर्जन्यमानामुळे शेतकºयांना शेतीतील उत्पादनात मोठा फटका बसला. त्यामुळे यावर्षी शेतकºयांची आर्थिक घडी विस्कटली आहे. परिणामी इतर खर्च व विद्युत देयके भरणे शेतकºयांना अवघड झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य व शेतकरी वर्ग महावितरणच्या थकबाकीदारांच्या यादीत मोडला आहे.   परंतू थकित वीजबिले भरण्यासाठी ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत नाही. दुष्काळी परिस्थितीत विद्युत देयके भरण्यासाठी महावितरणकडून तगादा लावला जात असल्याने महावितरणचे कर्मचारी व ग्राहक यांच्यामध्ये वादाच्या घटना समोर येत आहेत. यासंदर्भात महावितरणच्या अधिकाºयांशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही. हल्ल्याने महावितरणच्या कर्मचाºयांमध्ये खळबळथकबाकी वसुलीस गेलेल्या महावितरणच्या पथकातील संदिप गव्हांदे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी मेहकर तालुक्यात गोहोगाव दांदडे येथे हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामुळे महावितरणच्या कर्मचाºयांमध्ये खळबळ उडाली आहे. तर इतर कर्मचाºयांमध्येही वसुलीसाठी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाmahavitaranमहावितरण