धक्कादायक! वैफल्यग्रस्त तरूणानं स्वतःचंच सरण रचून केला आत्मघात; लग्न जुळत नसल्यानं होता निराश
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 11:00 IST2022-02-17T10:53:34+5:302022-02-17T11:00:28+5:30
खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील महेंद्र नामदेव बेलसरे (२७) हा युवक गत काही दिवसांपासून लग्न जुळत नसल्याने निराश होता.

धक्कादायक! वैफल्यग्रस्त तरूणानं स्वतःचंच सरण रचून केला आत्मघात; लग्न जुळत नसल्यानं होता निराश
बुलडाणा: लग्न जुळत नसल्याने निराश झालेल्या एका वैफल्यग्रस्त तरुणाने स्वतःचेच सरण रचून आत्मघात केल्याची घटना घडली आहे. खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथे गुरूवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
खामगाव तालुक्यातील पळशी खुर्द येथील महेंद्र नामदेव बेलसरे (२७) हा युवक गत काही दिवसांपासून लग्न जुळत नसल्याने निराश होता. गुरूवारी पहाटे त्याने स्वत:च्या शेतात सरण रचून डिझेलच्या सहाय्याने पेटवून घेतले. गंभीररित्या भाजल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर खामगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली असून खामगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याप्रकरणी पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत. निराशेतूनच युवकाने आत्महत्या केल्याचा दावा पोलीस सुत्रांकडून केला जात आहे.
यासंदर्भात बोलताना पळशी खुर्दचे पोलीस पाटील गजानन पाटील म्हणाले, पेट्रोल अंगावर घेऊन युवकाने पेटवून घेतले. त्याने सरण रचले नाही. आगीच्या ज्वाळांमुळे शेतातील पऱ्हाटीची गंजी पेटली. जास्त भाजल्याने त्याचा मृत्यू झाला.