शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

अल्प पावसामुळे दुष्काळाचे सावट !

By admin | Updated: July 25, 2015 01:26 IST

बुलडाणा जिल्ह्यात केवळ १५0 मि.मी. सरासरी पाऊस.

बुलडाणा : जुलैमधील पावसाच्या प्रदीर्घ दडीमुळे जिल्ह्यात सरासरी ५0 टक्केच पाऊस पडला आहे. अपुर्‍या पावसामुळे खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. मागील तीन-चार दिवसांपासून काही तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू आहे; परंतु पाऊस सार्वत्रिक व संततधार नाही. या पावसामुळे दुबार पेरणी करण्यासही शेतकर्‍यांची हिम्मत होत नसल्यामुळे खरीप हंगाम पूर्णत: धोक्यात आला आहे. जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात २९९.२ मि.मी. पावसाची अपेक्षा असताना जिल्ह्यात केवळ १५0 मि.मी. पाऊस झाला आहे. या पावसाची सरासरी टक्केवारी ५0.१४ आहे. चांगल्या पिकांसाठी तसेच पेरणीसाठी कमीत कमी सरासरी ७0 मि.मी. पावसाची गरज असते. दीड महिन्यापूर्वी मॉन्सूनच्या पावसाचे आगमन झाले होते. तत्परतेने शेतकर्‍यांनी ८0 टक्के पेरण्या आटोपल्या; मात्र पावसाने प्रदीर्घ दडी मारल्यामुळे पिके कोमेजून गेली आहेत. आजरोजी जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर काही तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू आहे; मात्र त्यापूर्वीच अनेक शेतकर्‍यांनी कोमेजलेल्या पिकांची वखरणी केली होती. ज्यांच्या सिंचनाची सुविधा आहे, त्यांची पिके काही प्रमाणात चांगली आहेत; मात्र येणार्‍या काळात जमिनीच्या पोटातील पाणी कमी झाल्यास सिंचनासाठी अडचणी येणार आहेत. तर पेरणी न केलेल्या तसेच कोमेजलेल्या पिकांची वखरणी केलेल्या शेतकर्‍यांची दुबार पेरणीसाठी हिम्मत होत नाही. एकूण यावर्षीचा खरीप हंगाम धोक्यात आला आहे.