शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
इराणची नाकेबंदी युक्रेन तोडणार! अमेरिकेच्या हाती लागलं 'ब्रह्मास्त्र'; होर्मुजमध्ये आता रक्ताचा खेळ?
4
'मला पर्याय शोधून दाखवाच!', भरमिटिंगमध्ये अपमान केल्याने तरुणीचा तडकाफडकी राजीनामा; सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
5
सायको किलर! २५ तासांत ३ हत्या करणाऱ्या गुरप्रीतच्या बॅगेत होतं ७ मृत्यूंचं गुपित
6
‘सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद’च्या अफवा खोट्या; एअर इंडियाने दिले स्पष्टीकरण, पण...
7
Shocking: खळबळजनक! लिंबू तोडल्याच्या रागातून १२ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या; १२ जणांना अटक
8
एलिफंटा ते नाणेघाट : प्राचीन व्यापाराचा ‘कॉरिडॉर’ उजेडात; पुरातत्व विभागाचे उत्खनन, व्यापारावर शिक्कामोर्तब
9
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
10
शिंदेसेनेच्या ९ नगरसेवकांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; प्रकरण काय आहे?
11
Art Of Living: तुम्हाला माहीत आहे का? श्री श्री रवीशंकर त्यांच्या नावात दोनदा 'श्री' का लावतात?
12
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
13
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
14
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
15
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
16
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
17
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
18
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
19
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
20
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
Daily Top 2Weekly Top 5

ठिबकवरील पिके ऑक्सीजनवर

By admin | Updated: June 28, 2014 22:40 IST

पावसाअभावी शेतकर्‍यांचे खरीप पिकांचे नियोजन संपूर्ण गडबडले असून, ठिबक वरील पेरण्यासुद्धा ऑक्सीजनवर असल्यामुळे शेतकर्‍यांचे तोंडचे पाणी पळाले आहे.

मोताळा : तालुक्यात मृगनक्षत्र कोरडा गेला असून अपेक्षाकृत पावसाचे आगमन न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. आद्रा नक्षत्रातही पावसाचा रूसवा कायम दिसत असून पेरणी योग्य पावसाअभावी शेतकर्‍यांचे खरीप पिकांचे नियोजन संपूर्ण गडबडले असून, ठिबक वरील पेरण्यासुद्धा ऑक्सीजनवर असल्यामुळे शेतकर्‍यांचे तोंडचे पाणी पळाले आहे.
मागील काही वर्षापासूनचा पावसाचा लहरीपणा पाहता धूळ पेरणी जरी तालुकयात झाली नसली तरी मृगाच्या भरवश्यावर जवळपास ८ हजाराच्यावर शेतकर्‍यांनी ठिबक वर कापसाची लागवड केल्याचे समजते. मृगात हमखास पावसाचे आगमन होत असल्याच्या आशेने विहिरीमधील पाण्याच्या भरवश्यावर या भागातील शेतकरी वर्ग ठिबकवर कापासाची लागवड करतो. विहिरीचे पाणी संपेपर्यंत मृगाचा पाऊस येत असल्यामुळे कापासाची पेरणी चांगल्याप्रकारे साधून उत्पादनसुद्धा मोठय़ा प्रमाणात शेतकर्‍यांना मिळत आले आहे. मात्र यावेळेस मृग कोरडा गेल्यामुळे तालुकाभरातील विहिरीची पाण्याची पातळी खोल गेली असून, बर्‍याच विहिरी आटल्यामुळे शेतकर्‍यांना हजार ते पंधराशे रूपयांपर्यंत पाणी विकत घेवून पिक वाचविण्याचा केविलवाणा प्रकार करावा लागत आहे. बहुतांश ठिकाणी पावसाळी वातावरणाअभावी पिकांची वाढ होत नसल्याचे शेतकरी सांगत असल्यामुळे शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. तालुक्यात पावसाचा थेंबच पडला नसल्यामुळे कापसाच्या मुख्य पिकासह इतर पिकांचासुद्धा मौसम गेल्यामुळे शेतकरी येणार्‍या पावसावर शेतीचे नियोजन कसे करावे या चिंतेत शेतकरी पडला आहे. कापसाची लागवडीसाठी जूनचा पहिला आठवडा महत्वपूर्ण असून जेवढया लवकर लागवड होईल तेवढे या पिकासाठी फायदयाचे ठरते. जूूनच्या तीसर्‍या आठवडयापर्यंत केलेली कापसाची लागवड शेतकर्‍यांसाठी फायदयाची असते. कमी कालावधी मध्ये येणार्‍या पिकांसाठीसुद्धा हे वर्ष शेतकर्‍यांसाठी कठीण जात असून पावसाअभावी मुंग, उडीद, मटकी,चवळी आदीं पिकाची लागवड शेतकरी करू शकला नाही. १५ जून ते १५ जुलै या काळात या पिकांची पेरणी होणे आवश्यक असून अल्पकाळामधील हि पिके ६0 ते ७0 दिवसांमध्ये तयार होतात. मात्र या पिकांची पेरणी ३0 जूनच्या आतमध्ये होणे आवश्यक असल्याचे जाणकार सांगतात. मात्र या कालावधीनंतर या पिकांची पेरणी झाल्यास उत्पादन न होता फक्त नासाडी होते. पावसाच्या रूसव्यामुळे शेतकर्‍यांसह जनावरांच्या चारा-पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वत्र कोरडे वातावरण असल्यामुळे जनजीवनसुद्धा प्रभावीत झाले असून ठिबक वरील पिके शेवटच्या घटका मोजत आहेत.