शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

पेयजल योजनांच्या कामांची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:19 IST

चिखली तालुक्यातील  गावांना महाराष्ट्र पेयजल योजनेत सामावून घेत नागरिकांना दिलासा द्यावा, या  आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या मागणीची दखल पाणी पुरवठा मंत्री ना.  बबनराव लोणीकर यांनी घेतली आहे. दरम्यान, या गावांसाठी महाराष्ट्र जीवन  प्राधिकरणांतर्गत नळ योजना आराखडा तयार करण्याचे तसेच सर्वच राष्ट्रीय पेयजल  योजनांच्या चौकशीचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देपाणी पुरवठा मंत्री ना. बबनराव लोणीकर यांचे निर्देश शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: सिंदखेडराजा मतदारसंघात सन २00६ ते २00८ या कालावधीत तब्बल  ५१ राष्ट्रीय पेयजल योजनांना मंजुरी मिळून निधीदेखील मिळाला असताना  आजरोजी ही गावे तहानलेली असल्याने या कामांची सखोल चौकशी होऊन  भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासह या व मतदारसंघातील चिखली तालुक्यातील  गावांना महाराष्ट्र पेयजल योजनेत सामावून घेत नागरिकांना दिलासा द्यावा, या  आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या मागणीची दखल पाणी पुरवठा मंत्री ना.  बबनराव लोणीकर यांनी घेतली आहे. दरम्यान, या गावांसाठी महाराष्ट्र जीवन  प्राधिकरणांतर्गत नळ योजना आराखडा तयार करण्याचे तसेच सर्वच राष्ट्रीय पेयजल  योजनांच्या चौकशीचे निर्देश दिले आहेत.सिंदखेडराजा मतदारसंघात सन २00६ ते २00८ या कालावधीत ५१ राष्ट्रीय  पेयजल योजनांना मंजुरी मिळून निधीही मिळालेला आहे; मात्र यापैकी एकाही  नळयोजनेचा फायदा संबंधित गावातील नागरिकांना झालेला नाही. यामध्ये मोठय़ा  प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे तसेच अनेक कामे अपूर्ण असल्याच्या तक्रारी  होऊनही त्यावर कोणतीच कारवाई झालेली नसल्याची बाब आमदार डॉ. शशिकांत  खेडेकर यांनी सन २0१७-१८ च्या अर्थसंकल्पीय विभागाच्या अनुदानाच्या  मागण्यांवर बोलताना ३0 मार्च २0१७ रोजी सभागृहात केली होती. या सर्व नळ  योजनांची चौकशी करावी, या गावांचा समावेश महाराष्ट्र पेयजल योजनेत करून  त्यांना पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी लावून धरली होती. याशिवाय चि खली तालुक्यातील शेलगाव आटोळ येथे पाच गावांची प्रादेशिक नळ योजना पूर्ण त्वास गेलेली असताना ही योजना अनेक वर्षांपासून नादुरुस्त असल्याने यावर  अवलंबून असलेल्या पाच गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.  त्यामुळे या पाणीपुरवठा योजनेच्या दुरुतीसाठी निधी देण्याची मागणी आ. खेडेकर  यांनी केली होती. या मागण्यांची दखल घेत पाणीपुरवठा मंत्री ना. बबनराव लोणीकर  यांनी त्यांच्या दालनात १३ नोव्हेंबर रोजी संबंधित विभागाचे सचिव, सहसचिव,  कक्ष अधिकारी यांची बैठक बोलावली होती. यामध्ये सिंदखेडराजा मतदारसंघातील सर्व पाणीपुरवठा योजनांची चौकशी करावी,  तसा अहवाल सादर करण्याबाबतच्या सूचना ना. लोणीकर यांनी संबंधित  अधिकार्‍यांना दिल्या. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत या गावांच्या  समावेशाबाबत तातडीने आराखडा तयार करण्याच्या सूचनाही दिल्या गेल्या.देऊळगाव राजा येथील महाराष्ट्र सुजल निर्मल अभियानांतर्गत खकडपूर्णा  प्रकल्पावरून देऊळगाव राजा  शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेबाबत सविस्तर  चर्चा करण्यात येऊन संबंधित विभागीय अधिकार्‍यांना त्याबाबत सूचना देण्यात  आल्या. दरम्यान, देऊळगाव राजा तालुक्यातील गोळेगाव, तुळजापूर, गिरोली बु,  गिरोली खु, निमखेड, वो. बावरा, प. झालटा, प. मलंगदेव या आठ कायमस्वरूपी  दुष्काळी गावांचा तसेच असोला बु., उंबरखेड, जवळखेड, चिंचोली बु., बाणखेड,  आळंद, गोंधणखेड, पिंपळगाव बु., रोहना, दगडवाडी या दुष्काळी दहा गावांचा  खडकपूर्णा धरणावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत प्रादेशिक नळ योजनांचा  समावेश करावा, अशी मागणी आ.डॉ. खेडेकर यांनी केली असता याबाबत तातडीने  कारवाई करण्याचे निर्देश ना. लोणीकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी  अधिकारी यांना दिले. त्यामुळे आ.डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या पाठपुराव्यास यश  आले आहे. 

टॅग्स :Babanrao Looneykarबबनराव लोणीकरWaterपाणी