फवारणीच्या ग्लासातील पाणी पिल्याने विषबाधा, तरुणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 18:39 IST2018-09-20T18:38:55+5:302018-09-20T18:39:52+5:30

खामगाव: हिंगणा भोटा येथील युवतीचा मृत्यू

Drinking spraying glass consumes poisoning and the death of the girl | फवारणीच्या ग्लासातील पाणी पिल्याने विषबाधा, तरुणीचा मृत्यू

फवारणीच्या ग्लासातील पाणी पिल्याने विषबाधा, तरुणीचा मृत्यू

खामगाव : हिंगणा भोटा (ता.शेगाव) येथील एका युवतीने फवारणीच्या ग्लासातील पाणी पिले. त्यामुळे विषबाधा होवून सदर युवतीचा मृत्यू झाला. मनिषा गजानन खवले (16 वर्षे) असे मृतक युवतीचे नाव आहे. ही घटना गुरूवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली. 

हिंगणा भोटा येथील शेतकरी गजानन खवले यांनी बुधवारी शेतात किटक नाशकाची फवारणी केली. फवारणी करण्यापूर्वी औषधाच्या बाटलीतील किटकनाशक ग्लासाने फवारणी पंपात टाकले. त्यानंतर तो ग्लास शेतात ठेवून दिला. दरम्यान, या ग्लासातून शेतात निंदण (गवत काढत) करीत असलेल्या त्यांच्या मुलीने पाणी पिले. त्यामुळे तिची प्रकृती अत्यवस्थ झाल्याने तिला खामगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान दुपारी 1 वाजता तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शेगाव तालुक्यात खळबळ उडाली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Drinking spraying glass consumes poisoning and the death of the girl