शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा ग्रंथालय ठरत आहे विद्यार्थी वाचकांसाठी दीपस्तंभ!

By admin | Updated: October 15, 2015 00:33 IST

युवा वाचकांसह सर्व वयोगटातील वाचकांना प्रेरणा

बुलडाणा: बुलडाणा शहरात वर्ष १९५७ मध्ये स्थापन झालेले जिल्हा ग्रंथालय हे आज ५८ व्या वर्षीसुद्धा विद्यार्थी वाचक वर्गासाठी दीपस्तंभ म्हणून काम करीत आहेत. येथे उपलब्ध असलेली विविध गं्रथसंपदा, मासिके, बालसाहित्य, वृत्तपत्रे यामुळे युवा वाचकांसह सर्व वयोगटातील वाचकांना प्रेरणा मिळत आहे.जिल्ह्यात असलेली ३0४ शासन मान्यताप्राप्त ग्रंथालये नेहमीच वाचनासाठी प्रेरणांचे स्रोत ठरले आहे. त्यामुळे देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिवस पहिल्यादांचा १५ ऑक्टोबर रोजी ह्यवाचक प्रेरणादिनह्ण म्हणून जिल्ह्यातील सर्व गं्रथालयातून साजरा होणार आहे. शहरात असलेले जिल्हा ग्रंथालयाची यात महत्वाची भुमिका आहे. या ग्रंथालयाचा ९0 टक्के वाचक वर्ग ग्रामीण भागातील मुलामुलींचा आहे. शिवाय सकाळी ८ ते सायंकाळी ८ अशी १२ तासाची वाचन सेवा वाचक वर्गाला ग्रंथालयातून नि:शुल्क पुरविण्यात येते. त्यामुळे विविध स्पर्धा परिक्षांची तयार करणार्‍या वाचक विद्यार्थ्यांंंंसाठी जिल्हा ग्रंथालय आज प्रेरणादायी ठरले आहे. *सामाजिक कार्याची झालरजिल्हा ग्रंथालयाच्या वाचन प्रेरणा संस्कृतीला सामाजिक कार्याची झालर लाभली आहे. गं्रथालयाकडून वाचकांसाठी वर्षातून सहा ग्रंथ प्रदर्शन, शिवाय मुलामुलींना मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर आयोजित केली जाते. याशिवाय जिल्हा कारागृहात कैद्यासाठी चालविल्या जाणार्‍या वाचनालयास मोफत पुस्तक पुरविले जाते.*१ लाख ३0 हजार ग्रंथसंपदाजिल्हा गं्रथालयाचे ३७00 वाचक तसेच १८१ संस्था सभासद आहे. या वाचकांना प्रेरणा देण्यासाठी गं्रथ आणि पुस्तकांनी नेहमीच मोठी भूमिका बजावली आहे. येथील जिल्हा ग्रंथालयात १ लाख १0 हजार ग्रंथ व संदर्भगं्रथ आहेत. याशिवाय २0 हजार स्पर्धा परीक्षा पुस्तक, माहिती पुस्तक, बालसाहित्य, विविध धर्मग्रंथ, शब्दकोष, विश्‍वकोश, ७0 मासिके, ३0 वृत्तपत्रे वाचकांसाठी नि:शुल्क उपलब्ध आहे.