शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

बर्पाच्या गोळ्यातून विकला जातो आजार

By admin | Updated: April 10, 2015 02:24 IST

बुलडाणा जिल्ह्यात निकृष्ट दर्जाच्या बर्फाची विक्री ; घातक रंगांचा वापर.

खामगाव : कोणत्याही परवानगीविना निकृष्ट दर्जाच्या फेप्सीची (आइस कॅन्डी) शहर आणि परिसरात मोठय़ा प्रमाणात विक्री होत आहे, तर आइस गोळ्यासाठी वापरल्या जाणार्‍या रंगाचाही दर्जा आरोग्यास घातक आहे. त्यामधून आजारच विकला जात आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे वास्तव ह्यलोकमतह्णने ्रॅ्नॅवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघडकीस आले. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शीतपेयांची विक्री वाढते. या गोष्टीचा नेमका फायदा घेत, कमी श्रमात, कमी गुंतवणुकीत अधिकाअधिक नफा कमविण्याच्या उद्देशाने काही जण शहरात निकृष्ट दर्जाच्या पेप्सीचा पुरवठा करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. पूर्वीच्या काळी कांडी आणि बेरारची जागा आता फेप्सीने घेतली आहे. त्यामुळे पूर्वीचे कांडी आणि बेरार बनविण्याचे कारखाने आता कालबाह्य झाले असून, कमी जागेत, कमी खर्चांमध्ये फेप्सीचा व्यवसाय थाटला जातो. एक पॅकिंग मशीन आणि इतर किरकोळ साहित्याच्या जोरावर एका खोलीतच फेप्सीची निर्मिती होत असल्यामुळे कोणत्याही परवानगीविना शहरातील एका वस्तीमध्ये घरच्या घरी तीन-चार ठिकाणी फेप्सी निर्मितीचा व्यवसाय थाटण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव आढळून आले आहे. ह्यफेप्सीह्ण ४0 रुपये शेकडा! फेप्सीचे दर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आढळून आले. लोकल दर्जाची पेप्सी ४0 रुपये शेकड्यापासून ५0 रु पयांपर्यंत बाजारात उपलब्ध आहे, तर काही नामांकित कंपन्यांचीही पेप्सी बाजारात आहे. या पेप्सीच्या शंभर नगांसाठी मात्र ७0-८0 रुपये मोजावे लागतात. व्यवसायातील माजिर्न कमी होत असल्यामुळे विक्रेते जास्त नफा मिळत असलेल्या, आरोग्याला घात असली तरी, अशा पेप्सीच्या विक्रीलाच अधिक पसंती देत असल्याचे चित्र आहे. हा धोका उन्हाळ्यात प्रचंड वाढतो आहे.

ग्रामीण भागात घरीच तयार होते फेप्सी, आइस गोळा!

     विक्री करण्यात येत असलेल्या फेप्सीवर निर्मितीची तसेच वापर करण्याची शेवटची दिनांक याबाबत कोणताही उल्लेख नाही. त्याशिवाय प्लास्टिकच्या थैलीत असलेली ही फेप्सी अनेक दिवस विक्रीअभावी पडून राहतात. त्यामुळे त्यात फंगस दिसून आले आहेत.

निकृष्ट दर्जाच्या पाण्यासह रासायनिक रंगांचा वापर!

    शहर आणि परिसरात किरकोळ विक्रीसाठी तयार करण्यात येणारी फेप्सी (आइस कॅन्डी) रासायनिक रंग, निकृष्ट दर्जाचे पाणी आणि सॅकरीनपासून तयार केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने खाण्याचे प्रमाणित रंग, साखर महागले आहेत. फेप्सी तयार करण्यासाठी त्यांचा वापर केल्यास उत्पादनखर्च वाढतो. त्याच्या तुलनेत रासायनिक रंग आणि सॅकरीनचा वापर केल्यास निम्म्या खर्चात फेप्सी तयार होत असल्यामुळे निर्माते सर्रास रासायनिक रंग आणि सॅकरीनचा वापर करीत असल्याचे चित्र आहे.