शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

तोफेचे ‘अवमूल्यन’, सर्वपक्षीय निषेध

By admin | Updated: December 25, 2014 01:47 IST

ऐतिहासिक तोफेची किंमत पुरातत्व विभागाने काढली केवळ ४५00 रुपये.

सिंदखेडराजा : मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यातून ८५ किलो वजनाची तोफ चोरीला गेली असून, त्या ऐतिहासिक तोफेची किंमत पुरातत्व विभागाचे अभिरक्षक एम.वाय.कामठे यांनी फक्त ४५00 रुपये काढली आहे. या प्रकाराचा सिंदखेडराजा येथे निषेध करण्यात आला असून, ही किंमत काढणार्‍या अभिरक्षक कामठे यांचा निषेध करणारे निवेदन देण्यात आले.सिंदखेडराजा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजपा, शिवसेना यांसह सामाजिक संघटना यांनी तहसीलदार संतोष कणसे यांना निवेदन देऊन कामठे यांच्या या कृतीचा निषेध केला आहे. लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यावर पुरातत्व विभागाचे लक्ष नाही, असा आरोप निवेदनातून केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सदर तोफेची किंमत लाखो रुपये मानली जात असली तरी, या तोफेच्या चोरीमुळे समस्त जिजाऊ भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. या तोफचोरीचा तपास ताबडतोब लावावा, अशी मागणी केली आहे. राजवाड्याच्या देखरेखीची जबाबदारी असलेले अभिरक्षक एम.वाय.कामठे हे सिंदखेडराजा येथे कधीच येत नसल्याने आणि तोफेची किंमत ४५00 दाखवून समस्त जिजाऊ भक्तांच्या भावना दुखविल्या आहेत त्यामुळे कामठे यांना त्वरित निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अँड.नाझेर काझी, माजी खासदार सुखदेव काळे, तालुकाध्यक्ष शिवाजी राजे जाधव, भाजपाचे रावसाहेब देशपांडे, शिवसेना तालुका प्रमुख सतीश काळे, शिवसेना नेते रवींद्र पाटील, जय जवान जय किसान संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जून गवई, व्यापारी संघटना यांनी केली आहे.