शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

संस्थेविरूध्द दाखल केलेल्या तक्रारीची सखोल चौकशी व्हावी

By admin | Updated: July 25, 2015 01:23 IST

मातृभूमी फाऊंडेशनची मागणी, सपकाळ यांना बदनाम करण्याचा प्रकार असल्याचा आरोप.

बुलडाणा : एचआयव्ही एडस् संबंधित प्रकल्पाच्या अनुषंगाने एका महिलेने आमदार हर्षवर्धन सपकाळ संबंधित मातृभूमी फाऊंडेशनविरूध्द दाखल केलेल्या तक्रारीची सखोल चौकशी करावी, तसेच सदर तक्रारीमागील बोलविता धनी व पडद्यामागील सूत्रधारांविरूध्द कारवाई करावी, अशी मागणी मातृभूमी फाऊंडेशनचे कोषाध्यक्ष अनंत जाधव यांनी केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, जिल्ह्यात आजमितीस २७१२ एचआयव्ही बाधित रूग्ण आढळून आले आहेत. प्रत्यक्षात त्यापेक्षा ही संख्या जास्त आहे. याबाबत मातृभूमी फाऊंडेशन ही संख्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेने गेल्या १८ वर्षापासून कार्य करीत आहे. या पृष्ठभूमीवर प्रकल्पाच्या अनुषंगाने संस्थेशी संबंधित आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. सदर तक्रार खोटी आणि आमदार सपकाळ यांना बदनाम करण्याचा हा किळसवाणा प्रकार असून, या तक्रारीबाबत सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी मातृभमी फाऊंडेशन संस्थेने केली आहे. चौकशी अंती कुठलेही आरोप सिध्द होणार नाहीत, असा विश्‍वास निवेदनामध्ये व्यक्त करण्यात आला आहे. तक्रारीमागचे बोलविते धनी व पडद्यामागचे सुत्रधार यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. अशी मागणीही संस्थेच्या वतीने कोषाध्यक्ष जाधव यांनी केली आहे. या प्रकरणामागे असलेल्या कंपूने आमदार सपकाळ यांना बदनाम करण्याची श्रृखंला सुरू केली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यापूर्वीही त्यांच्या घराचे बांधकाम हे वनजमिनीशी संबंधित करून तक्रार करण्यात आली होती. याबाबत वारंवार पैशाची मागणीसुध्दा करण्यात आली होती. यावेळीही तक्रारदार महिलेची चित्रफित व दस्ताऐवज दाखवून पैशाची मागणी करण्यात आली असल्याचा गौप्यस्फोट जाधव यांनी केला. त्यांच्या धमक्यांना भिक न घालता येणार्‍या प्रसंगांना सामोरे जाण्याची भूमिका संस्थेने स्विकारली होती. सदर प्रकल्पाअंतर्गंत कोणत्याही महिलेचे नाव बळजबरीने किंवा दिशाभूल करून नोंदविलेले नाही, त्यामुळे कुणाचीही बदनामी करण्याचा प्रश्न येत नाही, असे जाधव यांनी स्पष्ट केले. या प्रकरणामागे असलेली मंडळी ब्लॅकमेलींग करणार्‍या वृत्तीची असल्याचा आरोप करून, संबंधित महिलेच्या तक्रारीची सखोल चौकशी करून तक्रारीमागे असलेल्या बोलविता धनीविरूध्द कडक कारवाई करावी, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.