शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
9
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
10
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
11
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
12
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
13
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
14
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
15
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
16
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
17
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
18
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
19
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
20
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
Daily Top 2Weekly Top 5

शेगावच्या दोन कर्मचा-यांची खातेनिहाय चौकशी

By admin | Updated: January 3, 2015 00:56 IST

रेती तस्करांमध्ये खळबळ ; दोन्ही तहसीलदारांकडून चाचपणी.

फहीम देशमुख /शेगावरेती तस्करांकडून मलीदा जमा करणार्‍या काही महसूल कर्मचार्‍यांचा भंडाफोड ह्यलोकमतह्णने केल्यानंतर महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली. या स्टिंग ऑपरेशनची दखल घेत शेगाव आणि बाळापूरच्या तहसीलदारांनी या प्रकरणाची चाचपणी केली असुन शेगावच्या दोन कर्मचार्‍यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.बाळापूर तहसील कार्यालयातील एक अधिकारी व दोन कर्मचार्‍यांना शेगाव शहरालगत वाहने अडवून त्यांचेकडून पैसे गोळा केले जात असताना लोकमतने स्टींग ऑपरेशन केले. बाळापूर तहसीलमधील काही कर्मचारी शेगावच्या हद्दित तर शेगाव तहसील कार्यालयातील काही कर्मचारी बाळापूर तालुक्याच्या हद्दित जावून हा प्रकार करीत असल्याचे लोकमत चमुला तीन दिवसांच्या पाहणीतून निर्देशनास आले. बाळापूरचे तहसीलदार समाधान सोळंके यांनी या प्रकाराची तात्काळ दखल घेत संबंधित कर्मचार्‍यांकडून जाब-जबाब घेतले. दुसरीकडे शेगावचे तहसीलदार डॉ.रामेश्‍वर पुरी यांच्या वाहनावरील चालकाचे कारनामे उघडकीस आल्यानंतर त्यांनीही चालकास चांगलेच धारेवर धरल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या स्टींग ऑपरेशमध्ये संबंधित अधिकारी तीन रेतीच्या वाहनांना ताब्यात घेताना दिसला. त्यांच्याकडून अवैधरित्या १५ हजार रुपयांप्रमाणे वसूल केले; मात्र स्टींग ऑपरेशन झाले असल्याची माहिती संबधीत अधिकार्‍यांना मिळताच, दोन वाहनांच्या रक्कमा शासनदप्तरी जमा केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र एका वाहनाचे १५ हजार रुपये वृत्त लिहेपर्यंत शासन दप्तरी जमा करण्यात आले नव्हते. उल्लेखनीय म्हणजे जी वाहने शेगाव शहरात पकडली, त्या वाहनांच्या पंचनाम्यामध्ये संबंधित अधिकार्‍याने घटनास्थळ अकोला जिल्ह्याचे दाखविले आहे. घटनेच्या तीन दिवसापूर्वीही याच चमूने शेगाव लगतच्या लोहारा गावात धाड टाकून दंडाच्या नावाने ३५ हजार रुपये गोळा केले होते. त्याचीही नोंद ्रुकुठेच उपलब्ध नसल्याचे दिसून आले. दोन्ही तहसीलदारांनी रेती तस्कराविरोधात उघडलेल्या मोहिमेमुळे संबधीत तस्करांना फक्त तहसीलदारांचे लोकेशन देणे आणि पकडलेली वाहने सोडून देण्यासाठी सुद्धा हप्तेखोरीच्या प्रकारात वाढ झाली आहे.