शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी केरळ पॅटर्न राबविण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:33 IST

डोणगाव : कोरोनावरील लसीकरणाचे काम केरळ राज्यात नियोजनबद्ध सुरू असून, एकही लस वाया गेलेली नाही. बुलडाणा सहराज्यात केरळचा लसीकरण ...

डोणगाव : कोरोनावरील लसीकरणाचे काम केरळ राज्यात नियोजनबद्ध सुरू असून, एकही लस वाया गेलेली नाही. बुलडाणा सहराज्यात केरळचा लसीकरण पॅटर्न राबविण्यात यावा, अशी मागणी बुलडाणा जिल्हा परिषदेचे कृषी सभापती राजेंद्र पळसकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्य सरकारकडून काेरोनाला आळा घालण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु, केरळ सरकारने नियोजनबद्धरीत्या उपाययोजना केल्याने मृत्युदरात मोठी घट झाली आहे. तेथील सरकारने प्रभागनिहाय समित्या स्थापन केल्या आहेत. त्यामुळे तातडीने उपचार करणे शक्य होत आहे. कोरोनावरील लसीकरणातही केरळ राज्याने आघाडी घेतली आहे. केंद्र सरकारकडून केरळ राज्यासाठी ७३ लाख ३८ हजार ८०६ लसींचे डोस उपलब्ध झाले. मात्र, तेथील आरोग्ययंत्रणेने एकही डोस वाया न घालविता ७४ लाख २६ हजार १६८ नागिरकांना लस दिली. याचा अर्थ तेथील यंत्रणेने अतिरिक्त ८७ हजार ३५८ नागरिकांना लस दिली. कोरोनाच्या संकट काळात मोफत वीज, पाणी आणि प्रत्येक कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचा घरपोच पुरवठा केला जात आहे. त्यामुळे केरळ राज्याचा पॅटर्न प्रभावी ठरत असून, हा पॅटर्न बुलडाणा जिल्ह्यासह राज्यात राबविण्यात यावा, अशी मागणी कृषी सभापती राजेंद्र पळसकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.