शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाड्यात दिला जातो निकृष्ट पोषण आहार

By admin | Updated: November 29, 2014 00:02 IST

चिखली तालुक्यातील प्रकार, चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात; स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक.

चिखली (बुलडाणा) : तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये जाणार्‍या बालकांना अत्यंत निकृष्ट दर्जाचा पोषण आहार दिल्या जात असल्याची बाब स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उघडकीस आणली असून पोषण आहार पुरविणार्‍या कंत्राटदाराकडून निष्पाप बालकांच्या आरोग्याशी खेळल्या जात असल्याने हा प्रकार तातडीने रोखण्यात यावा व संबंधीत कंत्राटदारावर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा तालुकाध्यक्ष विनायक सरनाईक यांनी दिला आहे.तालुक्यात एकूण ३२३ अंगणवाड्या असून यामध्ये १0 हजार ३९४ बालके दाखल आहेत. या बालकांना पोषण आहार पुरविण्याचे काम कंत्राटी पध्दतीने होत असल्याने कंत्राटदार आ पल्या अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहार बालकांना पुरवित आहे. पोषण आहारातील धान्य अत्यंत हिन दर्जाचे असून तांदूळ, चवळी, मटकी, हरबरा, मसूर दाळ, तूर दाळ, सोयाबीन या कडधान्याला किड लागलेली असते. हे धान्य जनावरेही खाऊ शकणार नाहीत, असे असते. धान्य पुरविणारी एजन्सी व ठेकेदार केवळ नफा कमविण्यात मश्गूल असून संबंधित अधिकारी व ठेकेदाराचे साटेलोटे असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. ठेकेदार मंडळी निष्पाप कोवळ्या मुलांच्या जीवाशी एकप्रकारे खेळत असून त्यांना बालकांच्या आरोग्याशी काहीच देणेघेणे नसल्याने कुपोषण कमी होण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला पोषण आहार बालकांच्या जीवावर उठला आहे.विकास औद्योगीक संस्था खामगाव यांच्याकडून सदरचा पोषण आहार पुरविण्यात आला होता. याबाबत सेविकांकडून किंवा सुपरवायझरकडून कुठल्याही प्रकारची माहिती कार्यालयात पुरविण्यात आली नसल्याची प्रभारी सांख्यीकी विस्तार अधिकारी बी.पी.आंभोरे यांनी दिली.