मद्य प्राशनाने तरुणाचा मृत्यू

By Admin | Updated: April 26, 2017 00:25 IST2017-04-26T00:25:20+5:302017-04-26T00:25:20+5:30

जळगाव जामोद : मद्य प्राशनाने जळगाव शहरातील संदीप विठ्ठल घोलप (वय २५) या तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना २५ एप्रिल रोजी घडली.

The death of the young person with alcohol | मद्य प्राशनाने तरुणाचा मृत्यू

मद्य प्राशनाने तरुणाचा मृत्यू

जळगाव जामोद : मद्य प्राशनाने जळगाव शहरातील संदीप विठ्ठल घोलप (वय २५) या तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना २५ एप्रिल रोजी घडली. घरची गरिबी आणि त्यात दारूचे व्यसन यामुळेच संदीपचा बळी गेला आहे. याप्रमाणे अनेक तरूण शहरात दारूचे व्यसनाधीन झाल्याचे दिसतात. मागील आठवड्यातच जळगावातील दारूबंदीसाठी महिलांनी एसडीओ कोर्टावर मोर्चासुद्धा काढला होता, हे विशेष. उन्हाळा असल्याने वाढलेले उष्णतामान आणि सततचे दारू पिणे, पोटात अन्न न घेणे; यामुळेच संदीपचा मृत्यू झाल्याचे समजते. संदीप हा अविवाहीत तरूण होता. त्याच्या पश्चात ६५ वर्षीय म्हातारी आई व भाऊ असा परिवार आहे.

Web Title: The death of the young person with alcohol