शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

दिवसाढवळ्या घरात घुसून महिलांचे दागिने लुटले

By admin | Updated: July 25, 2015 01:23 IST

अनुराबाद व मलकापूर येथील घटना.

मलकापूर (जि. बुलडाणा): महिलेला घरात एकटे पाहून अज्ञात चोरट्यांनी मारहाण करुन दागिण्यांसह रोख रक्कम लुटल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना अनुराबाद व मलकापूर शहरात २४ जुल रोजी दिवसाढवळ्या घडल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तालुक्यातील अनुराबाद येथील सौ.अर्चना सुरेश देठे (वय ३२) ही महिला घरात एकटी असल्याचे पाहून दोन ३५ ते ४५ वयोगटातील अज्ञात इसमांनी घरात प्रवेश करीत या विवाहितेला चाकूचा धाक दाखवून तिच्या गळ्यातील मनीमंगळसुत्राची ६ ग्रॅम सोन्याची पोथ अंदाजे किंमत १२ हजार रुपये तर नगदी ७ हजार रुपये असा एकूण १९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना शुक्रवारी सकाळी ९.३0 वाजेच्या सुमारास घडली.तर शहरातील बारादरी परिसरात राहणार्‍या सौ.कांचन संतोष पाटील (वय २0) ही विवाहिता एकटी असल्याचे पाहत एका इसमाने तिच्या घरात प्रवेश करीत तिला लोटपाट करुन मारहाण करीत गळ्यातील सोन्याच्या दोन पोथी अंदाजे किंमत १२ हजार रु., सोन्याचे कानातले ५ ग्रॅम अंदाजे किं.१0 हजार, चांदीचे जोडवे १0 ग्रॅम अंदाजे कि.५00 रुपये, नगदी १५ हजार असा एकूण ३७ हजार ५00 रुपयांचा मुद्देमाल लंपास करुन आरोपी फरार झाल्याची घटना सकाळी ११.३0 वा. च्या सुमारास घडली.दिवसाढवळ्या परिसरात घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून या दोन्ही घटनांमध्ये शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी एपीआय सपकाळे व एपीआय मोरे अधिक तपास करीत आहेत.