शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
5
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
6
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
7
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
8
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
9
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
10
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
11
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
12
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
13
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
14
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
15
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
16
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
17
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
18
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
19
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
20
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीची वसुली ग्राहकांच्या खिशातून

By admin | Updated: January 22, 2015 00:30 IST

वीज वितरण कंपनीकडून आर्थिक लूट; वसुली थांबविण्याची मागणी.

बुलडाणा : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने वीजनिर्मिती आकार, वीज पारेषण आकार आणि इन्टेरीम आकार अशा विविध माध्यमातून वीज ग्राहकांकडून बेकायदेशीर वसुली करण्याचा सपाटा सुरू केला असून, ग्राहकांची होणारी ही आर्थिक लूट त्वरित थांबवावी, अशी मागणी भ्रष्टाचारविरोधी लोकआंदोलन न्यासच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वीज वितरण कंपनीच्या एका परिपत्रकानुसार आर्थिक वर्ष २0११-१२ आणि २0१२-१३ मध्ये वीज वितरण कंपनीच्या नियोजनशून्य कारभारामुळे कंपनीचा ९३१२ कोटी रुपयांचा महसूल बाकी राहिला आहे.वीज निर्मितीचे ८८६ कोटी रुपये परिगणना करून वर्गीकरण करणे अद्यापपर्यंत बाकी आहे, तर २0१४-१५ या आर्थिक वर्षात १६१७ कोटी रुपयापर्यंत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय अतिरिक्त आकार म्हणून ग्राहकांकडून १९२.५३ कोटी रूपये ट्रान्समेशन चाज्रेसच्या नावाखाली बेकायदेशीर वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही बेकायदेशीर वसुली करून वीज वितरण कंपनी वीज ग्राहकांच्या खिशावर दरोडा टाकत असून, यापूर्वी अशा प्रकारे वसुली केल्या जात नव्हती. आता प्रत्येक वीज ग्राहकांच्या वीज बिलामध्ये हे अतिरिक्त चाज्रेस लावण्यात आले आहेत, त्यामुळे कंपनीने सुरू केलेली ही अतिरिक्त बेकायदेशीर वसुली त्वरित बंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर नीलेश भुतडा, संजय जोशी, अनूप श्रीवास्तव, मनोज चंदन, अमोल रिंढे यांच्या सह्या आहेत.*बुलडाणा जिल्ह्यात चार कोटींची होणार वसुली बुलडाणा जिल्ह्यात ४ लाख ७ हजार २00 विद्युत ग्राहक आहेत. सर्वसाधारण वीज ग्राहक १५0 युनिट वीज वापरतो. कंपनीने अशा वीज ग्राहकांच्या वीज बिलात १00 रुपये अतिरिक्त चाज्रेस लावले तर जिल्ह्यातील वीज ग्राहकाकडून ४ कोटी ७0 लाख २१ हजार रुपये नियमबाह्यरीत्या वीज ग्राहकाकडून वसूल करणार असल्याचे स्पष्ट होत आहे.