११ जुगाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:51 IST2021-02-23T04:51:53+5:302021-02-23T04:51:53+5:30

पोलीसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारला असता ११ जणांना रंगेहाथ पकडले. यावेळी श्रीकृष्ण बळीराम नारखेडे (६५), प्रकाश परशराम जाधव (३५), ...

Crimes filed against 11 gamblers | ११ जुगाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल

११ जुगाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल

पोलीसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारला असता ११ जणांना रंगेहाथ पकडले. यावेळी श्रीकृष्ण बळीराम नारखेडे (६५), प्रकाश परशराम जाधव (३५), सुरेश नारायण हिवाळे (३८), भिकाजी गुणाजी सरकाटे (४१), प्रकाश साधू सरकाटे (५५), सुरेश प्रकाश खंडाळकर (६०, सर्व रा. आडविहीर) या सहा जणांना सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळताना पकडले. गावातील आरोग्य केंद्रालगत जुगार खेळणाऱ्या सुनील तुळशीराम सरकाटे (३२), अमोल शांताराम तायडे (३८), विजय मधुकर सरकाटे (३२), प्रल्हाद भिकाजी सरकाटे (६८), आत्माराम भोनाजी सरकाटे (६८) या पाच जणांना पकडले. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी बोराखेडी पोलिसांनी ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड काँस्टेबल राजेश आगाशे, संजय गोरे करीत आहेत.

Web Title: Crimes filed against 11 gamblers