शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : बुलडाणा जिल्ह्यात सक्रिय रुग्णांचे प्रमाण २.४१ टक्क्यांवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 12:19 IST

CoronaVirus in Buldhana वर्तमान स्थितीत  २.४१ टक्के रुग्णच सक्रिय असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांचे प्रमाण झपाट्याने कमी झाले असून वर्तमान स्थितीत  २.४१ टक्के रुग्णच सक्रिय असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. अशी स्थिती असतानाही आरोग्य विभागाने आरटीपीसीआर टेस्टलाच प्राधान्य दिले असून, जिल्ह्यातील एक लाख  सात हजार ९४० संदिग्ध रुग्णांपैकी ६८ टक्के संदिग्धांच्या आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्या आहेत.    बुलाडाणा जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट अद्यापही ११.७४ टक्के आहे. जो की दहा टक्क्यांच्या आत प्रशासनास आणावयाचा आहे. एकंदरीत सक्रिय रुग्णांचे घटते प्रमाण पाहता येत्या कालावधीत हा जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा १० टक्क्यांच्या खाली येण्यास मदत होईल, असे आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितले. नाही म्हणायला दैनंदिन करण्यात येणाऱ्या चाचण्यांची तुलना करता हा पॉझिटिव्हीटी रेट ९.५३ टक्क्यांवर आणण्यात आरोग्य प्रशासनाला यश आले आहे. जिल्ह्याच्या २६ लाख लोकसंख्येपैकी आतापर्यंत १ लाख सात हजार ९४० संदिग्धांच्या चाचण्या पूर्ण करण्यात आल्या असून, एकूण लोकसंख्येच्या ४.१५ टक्के नागरिकांच्या आतार्पंत चाचण्या करण्यात आलेल्या आहेत, असे सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत १५२ व्यक्तींचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्युदर हा १.१९ टक्क्यांवर गेल्या दोन महिन्यापासून स्थिरावला आहे. हे कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे शक्य होत आहे. यासोबतच जागृती झाल्याचाही परिणामही यास कारणीभूत आहे.

२७ टक्के संदिग्धांच्या रॅपिड टेस्टजिल्ह्यातील ४.१५ टक्के नागरिकांच्या गेल्या नऊ महिन्यांत कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी २७ टक्के चाचण्या या रॅपिड टेस्टद्वारे करण्यात आल्या, तर आरटीपीसीआर चाचण्या ६८ टक्के संदिग्धांच्या करण्यात आल्या आहेत. ट्रुनॅटद्वारे अवघ्या पाच टक्के संदिग्धांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाकडून प्राधान्याने आरटीपीसीआर चाचण्या व  रॅपिड टेस्टला प्राधान्य देण्यात येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या