शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

धरणांना पडली कोरड!

By admin | Updated: July 30, 2015 23:25 IST

दोन महिन्यांपासून बुलडाणा जिल्ह्यातील पाऊस गायब; जलसाठय़ात झपाट्याने घट.

बुलडाणा : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यामुळे सर्वत्र चिंताग्रस्त वातावरण आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले असले तरी आतापर्यंत सरासरी एक आठवडा पाऊस झाला. त्यानंतर २0 जूनपासून पाऊस बेपत्ता झाला, तर गत २६ व २७ जुलै या दिवशी काही तालुक्यात तुरळक स्वरूपात पाऊस पडला. परिणामी जिल्ह्यातील तीन मोठे, सात मध्यम व ७४ लघ प्रकल्पांतील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असून, जिल्ह्यातील धरणे अद्यापही तहानलेली आहेत.जिल्ह्यात मान्सूनचा पहिला पाऊस १३ जून रोजी पडला. त्यानंतर कमी-जास्त प्रमाणात एक आठवडा पाऊस पडला व २0 जूननंतर आतापर्यंत पावसाने खंड दिला आहे. १३ जूननंतर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जलप्रकल्पाच्या पातळीत नगण्य वाढ झाली व ही वाढ तेवढय़ाच झपाट्याने कमी होत आहे. २५ आणि २८ जुलै रोजी पडलेल्या पावसामुळे धरणांची तहान भागली नाही. जिल्ह्यातील नळगंगा, पेनटाकळी व खडकपूर्णा या मोठय़ा प्रकल्पांमध्ये महिन्यापूर्वी २३.१६ टक्के जलसाठा होता. आता ३५.९९ टक्के आहे. पलढग, ज्ञानगंगा, मस, कोराडी, मन, तोरणा व उतावळी या सात मध्यम प्रकल्पांत महिन्यापूर्वी २0.५२ टक्के जलसाठा होता. आता २९.४४ टक्के जलसाठा आहे. याशिवाय जिल्ह्यातील ७४ लघुप्रकल्पांमध्ये महिन्यापूर्वी ७.९१ टक्के जलसाठा होता. आता १२.१३ टक्केच जलसाठा वाढला आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात पाणीसाठय़ाची जी स्थिती होती, त्यात नगण्य वाढ झाली आहे; परंतु पावसाचा खंड वाढल्यास या प्रकल्पांतील पाणीसाठा तळ गाठण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प आहेत. यापैकी नळगंगा प्रकल्पात उपयुक्त ६९.३२ दलघमी साठय़ाच्या तुलनेत १८.२४ जलसाठा आहे. ही २४.४३ टक्केवारी आहे. पेनटाकळी प्रकल्पात उपयुक्त ५९.५७ दलघमी जलसाठय़ाच्या तुलनेत १४.0६ दलघमी जलसाठा आहे. त्याची टक्केवारी २३.६0 आहे. खडकपूर्णा प्रकल्पात ५0.0३ दलघमी जलसाठा आहे. त्याची टक्केवारी ४३.६४ आहे. सदर जलसाठा पावसाने दडी मारल्याने तसेच पाण्याचा वापर वाढल्यामुळे कमी-कमी होत आहे. * जलसाठय़ाचा सिंचनासाठी वापरपावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे; मात्र या दोन महिन्यात पावसाची सरसरी १५८.५ मिमीच्या वर वाढली नाही. आतापर्यंतच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या जलपातळीत नगण्य वाढ झाली आहे. जिल्ह्यातील तीन मोठे, सात मध्यम, सात महामंडळ व ७४ लघु प्रकल्प अशा एकूण ९१ प्रकल्पांमध्ये एका महिन्यापूर्वी १८ टक्के जलसाठा होता; मात्र बर्‍याच ठिकाणी या धरणातील पाण्याचा वापर सिंचनासाठी सुरू असल्यामुळे जलसाठा झपाट्याने खालावत आहे.