शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

नववर्षात पोलीस दादाही दिसणार हेल्मेटमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 17:39 IST

बुलडाणा: रस्ते अपघातामध्ये मृत्यूमूखी पडणाºयांची जिल्ह्यातील वाढती संख्या पाहता रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत दुचाकीस्वारांसह सहप्रवाशास हेल्मेटसक्ती करण्याचा घेण्यात आलेला निर्णय १ जानेवारीपासून राबविण्यात येणार आहे.

- ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा: रस्ते अपघातामध्ये मृत्यूमूखी पडणाºयांची जिल्ह्यातील वाढती संख्या पाहता रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत दुचाकीस्वारांसह सहप्रवाशास हेल्मेटसक्ती करण्याचा घेण्यात आलेला निर्णय १ जानेवारीपासून राबविण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी करणाºया पोलीस प्रशासन यंत्रणेलाच त्या संदर्भाने प्रथमत: शिस्त लावण्याचा विडा जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी घेतला आहे. त्यानुषंगाने नववर्षात प्रथमत: वाहतूक पोलिसांसह दुचाकीवर गस्त तथा कर्तव्यावर असताना ये-जा करणाºया पोलीस कर्मचाºयांनाच हेल्मेट वापरणाºया संदर्भात गंभीरतेने सुचना दिल्या गेल्या आहेत. त्यासंदर्भाने जिल्हा पोलीस दलात व्यापक स्तरावर जागृती करण्यासोबतच नियोजन करण्यात आले आहे. दुचाकीस्वारांवर साधारणपणे हेल्मेट नसल्यामुळे पोलीस यंत्रणा कारवाई करते. जवळपास ५०० रुपयांचा दंड यात आकारण्यात येतो. परंतू बहुतांश वेळेस कारवाई करणारे पोलीस दादाच रस्ता सुरक्षा नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे प्रथमत: आपल्या पोलीस दलालाच हा विषय गंभीरतेने समजाऊन सांगण्यासोबत त्याबाबतचे नियोजन जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयामार्फत सध्या करण्यात येत आहे. प्रभावी अंमलबजावणी अभावी हेल्मेट सक्ती कागदावरच राहिली. गतवर्षी तर हेल्मेट नसलेल्यांना पेट्रोल पंपवर पेट्रोल न देण्याचा फतवाही शासनाने काढला होता; परंतू हा नियम जास्त दिवस तग धरू शकला नाही. पुन्हा सर्वत्र परिस्थिती जैसे थे झाल्याचे दिसून आले. बुलडाणा जिल्ह्यात १ जानेवारीपासून हेल्मेट सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन व पोलीस विभागाचे संयुक्तरित्या कार्यवाही करण्याचे नियोजन सध्या सुरू आहे. दुचाकीने येणाºया शासकीय अधिकारी व कर्मचाºयांना सक्तीने हेल्मेटचा वापर करावा लागणार आहे. हेल्मेट न वापरणाºयांना कायदेशीर व दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. परंतू रस्त्यावर चौका-चौकात पोलीस अधिकारी स्वत: दुचाकी चालविताना दिसतात.  परंतू त्यांच्याकडे हेल्मेट कुठे दिसून येत नाही. काही पोलिसांकडे हेल्मेट असतानाही हेल्मेट घालण्याऐवजी ते दुचाकीच्या बाजूला अडकून ठेवले जाते. इतर नागरिकांना हेल्मेट न घातल्याने दंड करणारे स्वत:च नियमांचे उल्लंघन करतात. तेव्हा यांना दंड करणार कोण, असा सवाल उपस्थित होतो. परंतू  १ जानेवारीपासून जिल्ह्यात हेल्मेटची सक्ती करण्यात आली असल्याने यामध्ये दुचाकीवर फिरणारे सर्व पोलीसही हेल्मेटमध्ये दिसणार आहेत. त्यानुषंगाने शासकीय पातळीवरून नियोजन करण्यात येत आहे. 

जिल्ह्यातील ३३ पोलीस स्टेशनमध्ये जागृती दरबारहेल्मेट सक्तीचे अनुपालन हे स्वत: पासून व्हावे, यासाठी जिल्ह्यातील ३३ पोलीस स्टेशनमध्ये सध्या जागृती दरबार घेण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सध्या आठ ते दहा वाहतूक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना वाहतूक नियम व हेल्मेट सक्ती विषयी माहिती देणारे कार्यक्रम घेतल्या जात आहेत. जिल्ह्यातील वाढते अपघात लक्षात घेता ब्लॅक स्पॉटवरही पोलीस प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे.     

अधिकारी, कर्मचाºयांची होणार पडताळणीजिल्ह्यातील शासकीय सेवेतील सर्व अधिकारी व कर्मचाºयांना दुचाकीने कार्यालयात येताना हेल्मेट वापरणे सक्तीचे केले आहे. जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी शासनाच्या सर्व विभागांना सुचना दिल्या आहेत. नववर्षापासून होणाºया या अंमलबजावणीचे सर्व अधिकारी व कर्मचाºयांना पालन करावे लागणार आहे. यासंदर्भात प्रशासकीय पातळीवरून हेल्मेट न वापरणाºया अधिकारी व कर्मचाºयांची पडताळणी केली जाणार आहे. 

दुचाकी वापरणाºया प्रत्येकाने हेल्मेटचा वापर केला पाहिजे. त्यासाठी स्वत: पोलीस दलातील सर्व अधिकारी व कर्मचाºयांपासून हेल्मेट सक्तीची अंमलबावणी करण्यात येणार आहे. हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची १ जानेवारीपासून अंमलबजावणी होत असून त्यानुषंगाने सर्व पोलीस स्टेशनमध्ये जागृती निर्माण करण्यात येत आहे. - डॉ. दिलीप भुजबळ पाटील,जिल्हा पोलीस अधिक्षक, बुलडाणा. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिस