शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हय़ात १५ एप्रिलला संघर्ष यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2017 00:08 IST

सर्वपक्षीय बैठकीत आवाहन; शेतकरी, सामान्य नागरिकांनी सहभागी होण्याचे अवाहन.

चिखली : शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी मिळून त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहीजे, हा त्यांचा अधिकार असून, त्यांच्या वारसदारांना न्याय मिळालाच पाहिजे. मात्र, राज्य शासनाने संपूर्ण कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करू, अशी घोषणा करूनही अद्यापपर्यंंत कर्जमाफी न दिल्याने शेतकरी आत्महत्या वाढतच आहे. त्यामुळे निद्रीस्त शासनाचे डोळे उघडण्यासाठी व शेतकर्‍यांना न्याय मिळून देण्यासाठी संयुक्त संघर्ष यात्रेतील दुसर्‍या टप्प्यातील यात्रा मातृतीर्थ सिंदखेडराजा येथून १५ रोजी काढण्यात येणार असून, सकाळी १0 वाजता सिंदखेडराजा येथे, तर दुपारी ३ वाजता बुलडाणा येथे आयोजित सभा यशस्वी करण्याचे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी केले. विविध विरोधी पक्षांनी एकत्न येऊन राज्यात काढलेली शेतकरी कर्जमुक्ती संघर्ष यात्ना १५ एप्रिल रोजी बुलडाणा जिल्हय़ातून काढण्यात येणार आहे. या संघर्ष यात्रेच्या पूर्वतयारीसाठी बुलडाणा येथील गांधी भवनात ८ एप्रिल रोजी काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शेकाप, पीरिपा (कवाडे गट), शेतकरी संघटना, युनायटेड जनता दल, समाजवादी पक्ष आदी पक्षाच्या प्रमुख नेते मंडळीची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री भारत बोंद्रे होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, रेखाताई खेडेकर, श्याम उमाळकर, नाजेर काझी, विजय अंभोरे, संगीतराव भोंगळ, शेकापचे अँड.दत्ता भुतेकर, शेतकरी संघटनेचे डॉ.हसनराव देशमुख, एकनाथराव थुट्टे, पीरिपाचे राजा सावळे, समाजवादी पक्षाचे शे. आसिफ, अँड.साहेबराव सरदार, मुक्त्यारसिंग राजपूत, संजय राठोड, नाना कोकरे, समाधान हेलोडे, रियाजखॉ पठाण यांची प्रमुख उपस्थिती होती. काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीचीही बैठकविविध विरोधी पक्षांनी एकजुटीची मूठ बांधून शेतकरी कर्जमुक्ती संघर्ष यात्नेच्या रुपाने पुकालेले आंदोलन जिल्हय़ात यशस्वी व्हावे, यानुषंगाने ८ एप्रिल रोजी बचत भवन बुलडाणा येथे जिल्हा काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत संघर्ष यात्रा व सभेबाबतचे नियोजन ठरविण्यात आले.