जळगाव जामोद ( जि. बुलडाणा) : जळगाव नगराची विविध विभागाकडे जी प्रकरणे प्रलंबित आहेत ती जातीने लक्ष घालून पूर्ण करण्यात येतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किरण कुरंदकर यांनी २९ रोजी नगर परिषदेच्या सभागृहात कामकाजाचा आढावा घेताना केले. शंभर टक्के करवसुलीचा प्रयत्न करावा, रस्त्यांची व नाल्यांची कामे व्यवस्थीत करावी, गार्डन व शॉपींग कॉम्प्लेक्सची उभारणी करावी, शहर विकास आराखडा तयार करावा, आदी सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी न.प.कर्मचार्यांना दिल्या. या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रामदास बोंबटकार होते तर आ.डॉ.संजय कुटे, उपविभागीय महसूल अधिकारी धनंजय गोगटे, तहसिलदार नितीन हिंगोले, मुख्याधिकारी डॉ.प्रशांत शेळके, न.प.उपाध्यक्ष तुकाराम काळपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी भाजी मार्केट हस्तांतरण व पशुसंवर्धन जागचे हस्तांतरण यावर चर्चा झाली. जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांना महाराष्ट्र शासनाचा आदर्श महसूल अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच आ.डॉ.संजय कुटे यांची विधीमंडळाच्या ओबीसी समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शाल, श्रीफल व मानचिन्ह देवून नगराध्यक्ष रामदास बोंबटकार व मुख्याधिकारी डॉ.प्रशांत शेलके यांनी सत्कार केला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी नगर परिषद कार्यालयाची व कामकाजाची पाहणी केली.
जळगाव शहराच्या प्रलंबित बाबी त्वरित पूर्ण करणार - जिल्हाधिकारी
By admin | Updated: June 1, 2015 02:04 IST
जिल्हाधिकारी यांनी नगर परिषद कार्यालयाची व कामकाजाची केली पाहणी.
जळगाव शहराच्या प्रलंबित बाबी त्वरित पूर्ण करणार - जिल्हाधिकारी
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}