शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांविरुद्ध महिला कर्मचा-याची तक्रार

By admin | Updated: November 22, 2014 01:15 IST

शेगाव येथील प्रकार; मुलींच्या शासकीय वसतिगृहात चौकशी समिती दाखल.

शेगाव (बुलडाणा): विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या निकृष्ट दर्जाच्या जेवणातून विषबाधा झाल्याच्या प्रकरणातून प्रसिद्धीच्या झोतात आलेले शेगाव येथील शासकीय मुलींचे वसतिगृह व निवासी शाळा आता शिक्षिकेच्या एका गंभीर स्वरूपाच्या तक्रारीने पुन्हा चव्हाट्यावर येत आहे. ही तक्रार पुरुष शिक्षकांच्या संबंधित असल्याने आज समाज कल्याण अधिकार्‍यांच्या नेतृत्वात चौकशी समिती शेगावात दाखल होऊन कर्मचार्‍यांचे जबाब घेण्यात आले.शेगाव शहराबाहेर शासकीय मुलींचे वसतिगृह व निवासी शाळा असून, या शाळेतील शिक्षक आणि शिक्षिकेमध्ये मागील काही दिवसांपासून वाद-विवाद सुरू आहे. यातील राठोड नामक शिक्षिकेने येथील काही शिक्षकांविरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहे. याबाबत आपल्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार त्यांनी समाज कल्याण विभागाकडे दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर शिक्षिकेने दोन दिवसांपूर्वी आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबतचे प्रकरण पो.स्टे.पर्यंंत पोहचविले होते. याच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आज जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन ढगे यांच्यासह महिला व बाल कल्याण अधिकारी व संबंधित अधिकार्‍यांनी शेगाव येथे येऊन चौकशी सुरू केली. यामध्ये शिक्षक, कर्मचार्‍यांसह विद्यार्थिनींचेही जबाब नोंदविल्याची माहिती आहे. मुलींचे वसतिगृह असताना या वसतिगृहात पुरुष शिक्षक हे मुक्कामी राहतात, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे.समाज कल्याण अधिकारी नितीन ढगे यांनी सदर प्रकरणी नि:पक्ष चौकशी सुरू असून, यामध्ये तथ्य आढळल्यास थेट पोलिस कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.