शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

लोंबकळणा-या तारा धोकादायक

By admin | Updated: November 29, 2014 00:13 IST

बुलडाणा जिल्ह्यातील प्रकार, रोहित्र उघडे; वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष.

बुलडाणा : शहरातील अनेक भागातील विद्युत तारा लोंबकळत असून, रोहित्र अनेक ठिकाणी उघडे आहेत. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. याकडे वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्यामुळे केव्हाही मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.वीज वितरण मंडळाचे खासगीकरण झाल्यापासून सर्वत्र कारभार ढेपाळला आहे. शहरातील अनेक भागातील विद्युत रोहित्रांवर झाकण नाही. तर काही ठिकाणी रोहित्र पुर्णपणे तुटले आहेत. शहरातील बर्‍याच वीज खांबांवर विद्युत रोहित्र हे जमिनीपासून ३ ते ४ फूट उंचीवर असल्याने त्याची वायरिंग जमिनीवर लोंबकळत आहे. रोहित्राला सहजरीत्या कोणाचाही धक्का लागून दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही महिन्यांपूर्वी वीज वितरण कंपनीने शहरातील काही भागात नवीन रोहित्र लावले आणि खांबावर नवीन वीजतारा ओढल्या; मात्र यातील बरीच कामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहेत. शहरातील संगम चौक, सराफा गल्ली, इकबाल चौक, तेलगुनगर, पोलीस लाईन, जुनागाव परिसरातील रोहित्र जळणे, वीजपुरवठा खंडित होणे अशा समस्या नेहमीच्याच झाल्या आहेत. शहरातील नगर परिषदचामागील भाग, क्रीडा संकुल मार्ग, चर्च रोड, औरंगाबाद रोड, मलकापूर रोड, धाड नाका येथे बर्‍याच ठिकाणी उघडे विद्युत रोहित्र दुर्घटनेला आमंत्रण देत आहे, तर शहरातील दाट लोकवस्तीच्या ठिकाणी लहान मुले खेळत-खेळत विद्युत रोहित्राजवळ जाऊन उघड्या रोहित्राला छेडछाड करण्याची शक्यताही नाकारता येत नाही.