शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
2
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
3
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
4
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
5
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
6
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
7
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
8
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
9
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
10
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
11
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
12
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
13
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
14
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
15
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
16
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
17
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
18
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
19
Monsoon 2026 Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद चौघांना नागरिकांनी चोपले

By admin | Updated: May 9, 2014 00:31 IST

नागपूर येथील चार मद्यधुंद कार्यकर्त्यांनी बुधवारी चांगलाच हैदोस घातला

 
 
शेगाव :  शेगावात फिरण्यासाठी आलेल्या नागपूर येथील चार मद्यधुंद कार्यकर्त्यांनी बुधवारी चांगलाच हैदोस घातला होता. मद्यधुंद अवस्थेत एका एसटी चालकाला मारहाण केल्यानंतर या कार्यकर्त्यांची नागरिकांनी यथेच्छ धुलाई केल्याची घटना घडली.
बुधवारी शेगाव आगाराचे एसटी. चालक शेख सादिक हे बसस्थानकाकडे बस आणत असताना एम.एच. ३१ डीसी २७२७ या इनोव्हा गाडीच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन गजानन  महाविद्यालयाजवळ एसटीसमोर आडवे करून बस थांबविली व आमच्या गाडीला ओव्हरटेक कसे केले असे म्हणत वाद घातला व चालकाला मारहाण करून गाडी घेऊन पसार झाले. चालकाने सदर बाब शहरात आल्यावर आपल्या नातेवाइकांना सांगितली. यानंतर नागरिकांनी गाडीची शोधाशोध केली असता मंदिराजवळ दिसून आली; मात्र आपल्याला लोक शोधत आहे हे कळताच आपली गाडी सिनेस्टाईल खामगावकडे पळविली.
यानंतर लासुरा फाट्याजवळील एका ढाब्यावर बसले असता नागरिकांनी तेथे जाऊन चौघांची यथेच्छ धुलाई केली व याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर एपीआय तावडे यांनी घटनास्थळ गाठून चौघा युवकांना ताब्यात घेतले. यावेळी या चौघांनी आपण भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांचे कार्यकर्ते असल्याचे सांगितले.
सदर घटनेची माहिती नागपूरपर्यंत पोहचल्यानंतर शेगावातील भाजपाच्या पदाधिकार्‍यांना या  प्रकरणाची माहिती देऊन निपटविण्याचे आदेश देण्यात आले. यानंतर पो.स्टे.ला सदर प्रकरण आपसात झाल्याची नोंद स्टेशन डायरीवर करण्यात आली आहे.