शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

चिंचपूर येथे चिमुकलीसह विवाहितेचा जळून मृत्यू

By admin | Updated: July 10, 2015 00:05 IST

मातोळा तालुक्यातील घटना; दुर्दैवी घटनेने चिंचपूर परिसरात हळहळ.

मोताळा (जि. बुलडाणा): तालुक्यातील चिंचपूर येथील एका २५ वर्षीय विवाहितेचा स्वत:च्या चिमुकलीसह राहत्या घरात जळून मृत्यू झाल्याची घटना ९ जुलै रोजी सकाळी १0 वाजेच्या सुमारास घडली. प्राप्त माहितीनुसार चिंचपूर येथील प्रवीण पद्माकर गाडेकर (वय ३0) यांचे पाच वषार्ंपूर्वी मंगलासोबत विवाह झाला होता. लग्नानंतर २ ते ३ वष्रे हे कुटुंब पुण्यासह इतर ठिकाणी कामानिमित्त बाहेर होते. मागील दोन वर्षापासून प्रवीण गाडेकर आपली पत्नी मंगला, मुलगा अनुराग (वय ३ वर्ष) व मुलगी अनुराधा (वय सहा महिने) सह चिंचपूर गावात राहात होता. गुरूवारी ९ जुलै रोजी गावात कार्यक्रम असल्याने शेजारी व गावकरी जेवणासाठी गेले होते. दरम्यान, घरात कोणी नसताना मंगला गाडेकर आपल्या सहा महिन्याच्या चिमुकलीसह जळाली. या दुर्घटनेत सदर महिला ९0 टक्के जळाली. घटनेची माहिती होताच दोघांनाही तत्काळ बुलडाणा येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. सदर महिलेचा तीन वर्षांचा मुलगा अनुराग हा सुद्धा भाजला होता; मात्र घटनेवेळी तो ओरडत घराबाहेर पडल्याने त्याचा जीव वाचल्याचे गावकर्‍यांनी सांगितले.