विश्वातील प्रत्येक घटकाला जपणे हाच आहे परमेश्वराचा जप - संतोष तोत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 02:06 PM2019-11-19T14:06:17+5:302019-11-19T14:06:33+5:30

निसर्गनिर्मित प्रत्येक घटकाला जपणे हाच परमेश्वराचा जप आहे, असे प्रतिपादन सदगुरू श्री वामनराव पै यांचे सतशिष्य व प्रबोधनकार संतोष तोत्रे यांनी केले. 

This is the chant of the Lord in every aspect of the universe | विश्वातील प्रत्येक घटकाला जपणे हाच आहे परमेश्वराचा जप - संतोष तोत्रे

विश्वातील प्रत्येक घटकाला जपणे हाच आहे परमेश्वराचा जप - संतोष तोत्रे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : विश्वरूपाने परमेश्वर समोर, शरीर रूपाने जवळ व सच्चिदानंद स्वरूपात तो हृदयात वास करतो. म्हणून जगातील प्रत्येक गोष्ट ही परमेश्वराची सुंदर कलाकृती असून प्रत्येक प्राणी, पक्षी, वनस्पती या जीवनाला उपयुक्त आहेत. एखादा घटक जर नष्ट झाला तर मानवजात जगू शकणार नाही. म्हणून निसर्गनिर्मित प्रत्येक घटकाला जपणे हाच परमेश्वराचा जप आहे, असे प्रतिपादन सदगुरू श्री वामनराव पै यांचे सतशिष्य व प्रबोधनकार संतोष तोत्रे यांनी केले. 

जीवनविद्या मिशनच्या वतीने मुक्तेश्वर आश्रम, खामगाव येथे आयोजित केलेल्या समाज प्रबोधन महोत्सवात "सुखी जीवनाची गुरूकिल्ली" या विषयावर ते बोलत होते. परमेश्वराने स्वत:च्या हाताने स्वत: निर्माण केलेली स्वत:ची जीवंतमुर्ती म्हणजे मानवी शरीर. म्हणून शरीराला व्यसनांचा घाणेरडा नैवेद्य देणे, चैन-चंगळ, मौज-मजा करणे ही परमेश्वराची प्रतारणा होय याउलट व्यायाम, प्राणयाम, मेहनत व योग्य आहार देणे ही परमेश्वराची उपासना होय.  व्यसन म्हणजे विकत घेतलेली पिडा होय.

अर्धनरनारी नटेश्वर असणारा शिव सर्व जगात स्त्री व पुरूष या दोन जातींच्या रूपाने नटलेला आहे.  बुद्धीचे वरदान मिळालेल्या माणसाने या विश्वाचे रहाटगाडगे सुखनैव चालावे म्हणून स्त्री पुरूष एकत्र येऊन स्थापन केलेली सुंदर व्यवस्था म्हणजे कुटूंब व्यवस्था होय. आई-वडील, भाऊ-बहीण, दीर-भावजय, नवरा-बायको अशा अनेक नाते संबंधाने साकारलेले घर म्हणजे साक्षात भगवंताचे मंदीर होय. आई वडीलांची सेवा करणे, मुलांवर चांगले संस्कार करणे, नवरा बायकोने एकमेकांना प्रेमाने आदर देणे, सर्व नातेसंबंधाना जपणे हा ईश्वराचा जप आहे.  

कार्बनडायऑक्साईड रूपी विष प्राशन करून जगाला अॉक्सिजन रुपी अमृत देणारा प्रत्येक वृक्ष हे शिवशंकराचा अवतार अाहेत. माणसाने प्रचंड वृक्षतोड केल्याने ग्लोबल वार्मींग प्रचंड वाढले असून पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे. मोठ्याप्रमाणात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे हे मानवजातीचे कर्तव्य होय. स्वच्छता राखणे, प्लॅस्टिकचा वापर न करता पाणी व विजेचा वापर जपून करणे हाच परमेश्वराचा जप आहे, असेही ते पुढे म्हणाले. या प्रसंगी प्रचंड मोठ्याप्रमाणावर श्रोतावर्ग उपस्थित होता. महिलांची संख्या विलक्षण होती. माजी नगराध्यक्षा सरस्वती खाचणे , पंचायत समिती सभापती उर्मिला गायकी,  महादेवराव भोजने, गजानन उमाळे, अनासणे, एम. ए. सुरळकर. पुरूषोत्तम टेकाडे , पांडूरंग वावगे, सुनिल भोळे इ. अनेक मान्यवर उपस्थित होते. संचालन सुनिल बराटे यांनी केले.

Web Title: This is the chant of the Lord in every aspect of the universe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.